फलटण प्रतिनिधी :- फलटण शहरात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून गजाजन चौक येथील बंद किराणा दुकानाचे शटरचे कुलूप तोडुन रोख रक्कम व किराणा साहित्य अशी एकूण ८ हजार ३०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने चोरून नेले प्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास शहर पोलिस करत आहेत.
फलटण शहर पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दि.२५/११/२०२४ रोजी रात्रौ ९ ते दि.२६/११/२०२४ रोजी सकाळी ५:४५ वाजण्याच्या दरम्यान फिर्यादी सौरभ संजय तेली गजानन चौक, फलटण, ता.फलटण येथील न्यु गजराज किराणा दुकानातुन १)२ हजार ३०० रूपये किंमतीचा जेमिनी कंपनीचा १५ किलो तेलाचा एक पत्र्याचा डबा किं.अं.
२)५ हजार ३०० रूपये रोख रक्कम त्यामध्ये १०० रूपये दराच्या २२ चलनी नोटा, ५० रूपये दराच्या ३२ नोटा, १० रूपयेचे १५० काँईन
३)७०० रूपये किंमतीची एक अरब कंपनीची काळ्या रंगाची लाईटची बँटरी असा एकूण ८ हजार ३०० रूपयाचा मुद्देमाल अज्ञात व्यक्तीने किराणा दुकानाचे शटरचे कुलूप कशाचे तरी साहय्याने तोडुन, दुकानात प्रवेश करून फिर्यादी यांच्या दुकानातील काउंटरमधील रोख रक्कम व वरील वर्णनाचे साहित्य चोरून नेले आहे.याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास म.पो. हवा. राणी फाळके करत आहेत.