वाई-पाचगणी घाटात दरड कोसळली; स्थानिकांनी सुरळीत केली वाहतूक, प्रशासनाचा पत्ता नाही!
मुसळधार पावसामुळे घाटातील वाहतूक विस्कळीत; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निष्क्रियतेवर संताप महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क अजय संकपाळ, ब्युरो चीफ सातारा वाई, दि. ३ : पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या वाई-पाचगणी घाटात शुक्रवारी मुसळधार पावसामुळे बुवासाहेब मंदिराजवळ मोठी दरड कोसळून दगड, माती आणि मुरूम थेट रस्त्यावर आल्याने वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली…

