ढेबेवाडीसह परिसरात अंमली पदार्थांचा सुळसुळाट; तरुण पिढी विनाशाच्या उंबरठ्यावर
महाराष्ट्र माझा न्यूज नेटवर्क – ढेबेवाडी प्रतिनिधी :सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले पाटण तालुक्यातील शांत आणि संयमी म्हणून ओळखले जाणारे ढेबेवाडी गाव सध्या अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यामुळे चिंतेच्या छायेत आले आहे. परिसरात गांजासारख्या अंमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाल्याने तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जात असून, अनेक कुटुंबांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे…

