

वाई-सुरूर मार्गावर वृक्षतोड झाल्यास आत्मदहन : स्वप्नील गायकवाड
वाई :- वाई-सुरूर रोडवर रस्ता रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या रस्त्यावर पर्यटकांना तसेच प्रवास करणाऱ्यांना सुखद सावली देणारी अनेक शेकडो वर्षे जुनी झाडे तोडली जाणार असल्याने येथील पर्यावरणप्रेमींमध्ये अस्वस्थता पसरली आहे. ‘आरपीआय’च्यावतीने बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सातारा यांना निवेदन देऊन वृक्षतोड झाल्यास आत्मदहन करणार असल्याचा इशारा ‘रिपाइं ‘ने दिला आहे.रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले…

चोरगेवाडी ता.पाटण येथील शेतकरी बिबट्याच्या दहशतीच्या छायेत
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- ढेबेवाडी ता.पाटण येथील आसपासच्या वाड्या वस्तीवर गेले अनेक दिवसांपासून वन्यप्राणी मानवी वस्तीत येऊन पाळीव प्राण्यांवर हल्ला करत आहेत. ढेबेवाडी या परीसरातील काही गांवाचा समावेश सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये करण्यात आलेला आहे. चोरगेवाडी ता.पाटण येथे काही दिवसापुर्वी दोन शेळ्या व दोन कुत्री तर उत्तम बाबु चोरगे यांच्या गोठ्यात बांधलेली गाईवर…

ढेबेवाडीत रमजान ईद उत्साहात साजरी ; सदिच्छांची देवाणघेवाण अन् सलोख्यासाठी मागितली दुआ
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) : येथील मुस्लीम बांधवांनी रमजान ईद मोठ्या उत्साहाने व आनंदी वातावरणात साजरी केली. रमजान ईदच्या निमित्ताने सोमवारी सकाळी ८.30 च्या सुमारास ढेबेवाडी बाजारतळ येथेली मज्जीद येथे मोठ्या संख्येने समाज बांधव एकत्र येऊन सामुहिक नमाज अदा केली. उपवासाच्या माध्यमातून महिनाभर अल्लाहची साधना केल्यानंतर आलेले आनंदाचे पर्व. पाटण तालुक्यात ठिकठिकाणी ईदचा सण हा…

मुख्याधिकारी शंकर खंदारे व कराड नगरपालिकेच्या २ अधिकाऱ्यांसह चौघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
कराड : सोमवारी सायंकाळी कराड नगरपालिका परिसरात सातारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत नगरपालिकेच्या एका कर्मचाऱ्यास पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले आहे. सदर प्रकरणात कराड नगरपालिकेचे तत्कालीन मुख्याधिकारी शंकर खंदारे, कराड नगरपालिकेचे सहाय्यक नगररचनाकार स्वानंद शिरगुप्पे, बांधकाम विभागातील कनिष्ठ लिपिक तोफिक शेख यांच्यासह अजिंक्य देव या खासगी व्यक्तीचा या प्रकरणात सहभाग असल्याची माहिती…

श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या वतीने शैक्षणिक सेवाभावी संस्थांना भरीव मदत
फलटण प्रतिनिधी :- जाधववाडी तालुका फलटण येथील धनगर समाजाचे जागृत देवस्थान श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील सामाजिक शैक्षणिक व दिव्यांग क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्थांना आर्थिक स्वरूपात रोख रक्कम देऊन श्री. बिरदेव देवस्थान ट्रस्ट सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न केला आहे. कुरवली येथील वृद्ध आश्रम तसेच महात्मा शिक्षण संस्था संचलित मूकबधिर विद्यालय व ताथवडा…

ढेबेवाडी बाजारतळावरील व्यापारी कट्टे बनले आहेत शोपिस : शेखर लोखंडे
ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी ढेबेवाडी च्या बाजारतळावर व्यापाऱ्यांना कट्टे बांधून दिले परंतु गेल्या वर्ष भरापासुन हे व्यापारी कट्टे फक्त शोपिस बनले आहेत. येथील व्यापारी बाजारतळावरील कट्ट्यावर न बसता झेंडा चौक येथील रस्त्याच्या दोन्ही बाजुला बसून भाजिपाला विकत असल्याने वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. या कट्ट्यांचा विक्रेते उपयोग करत नसल्याने…

“वीजबिल भरा अन् गैरसोय टाळा” महावितरणतर्फे जाहीर आवाहन
फलटण प्रतिनिधी :- मार्च अखेर ग्राहकांकडे वीजबिलाची काेट्यवधीची थकबाकी आहे. त्यामुळे बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी ग्राहकांना केले आहे. थकबाकीमुळे महावितरणला प्रचंड मोठ्या आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. ग्राहकांना २४ तास वीज पुरवठा करण्यासाठी दर महिन्याला वीज खरेदी करावी लागते. महावितरणची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन ग्राहकांनी वीज बिलांचा भरणा करण्याचे आवाहन महावितरणने केले…

लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीचा सोहळा संपन्न
मुंबई (महेश जाधव) : महाराष्ट्राचे पोलादी पुरुष, राज्याचे माजी गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री लोकनेते स्व. बाळासाहेब देसाई यांच्या ११५ व्या जयंतीनिमित्त पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या मुंबई येथील पावनगड निवासस्थानी सोमवारी जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्यासह राज्य…

श्रीराम सहकारी साखर कारखान्यावर प्राधिकृत अधिकारी म्हणून श्रीमती प्रियंका आंबेकर, उपविभागीय अधिकारी, फलटण यांची नियुक्ती
फलटण प्रतिनिधी : – प्रादेशिक सहसंचालक, (साखर), पुणे विभाग, पुणे यांच्या कार्यालयाकडून आज दिनांक २०/०३/२०२५ रोजी जा. क्र. प्राससंसा/प्रशासन/श्रीराम ससाका/कलम ७७ अ(ब)/५२७/२०२५ नुसार महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७७ अ (१) (ब) अन्वये श्रीराम सहकारी साखर कारखाना मर्यादित, फलटण, ता. फलटण, जि. सातारा या कारखान्याचे प्रशासकीय कामकाज पहाणेसाठी श्रीमती प्रियंका विठ्ठल आंबेकर, उपविभागीय…

दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मंजुरी प्रकरणी आमदार सचिन पाटील यांचे फलटण बार असोसिएशन तर्फे मानण्यात आले आभार
फलटण प्रतिनिधी:- माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी फलटण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तात्काळ चालू करण्यासाठी होत असलेल्या यशस्वी प्रयत्नाबद्दल फलटण बार असोसिएशन तर्फे आमदार सचिन पाटील यांचे आभार मानण्यात आले. फलटण येथे दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर तात्काळ चालू करण्यासाठी उपलब्ध न्यायालय जागा व न्यायाधीश यांच्या राहण्यासाठी बंगला भाडेतत्त्वावर उपलब्ध…