फलटण तालुक्यातील जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणा-या पाच जणांच्या टोळीला दोन वर्षाकरीता केले तडीपार

फलटण: कुरेशीनगर फलटण येथील फलटण तालुक्यातील जनावरांची कत्तल करुन वाहतुक करणा-या पाच जणांच्या टोळीला सातारा जिल्ह्यातून तसेच सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, व पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत करण्यात आला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्हयामध्ये फलटण शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये सातत्याने गुन्हे करणारे टोळी प्रमुख १) तय्यच आदम कुरेशी (वय ४५ वर्षे, टोळी सदस्य), २) आरीस गफुर कुरेशी (वय ३६ वर्षे), ३) बिलाल रफिक कुरेशी (वय-३४ वर्षे), ४) झिशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी (वय २० वर्षे), ५) आबू ऊर्फ अल्ताब अफसर कुरेशी (वय २६ वर्षे), सर्व रा. कुरेशीनगर फलटण जि सातारा. यांच्या टोळीवर फलटण शहर पोलिस ठाण्यात येथे महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र प्राणी संरक्षण (सुधारणा) अधिनियम १९९५ व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम १९६० हे कायदे लागु असताना आणि सदर कायद्यानुसार गोवंशीय जनावरांची कत्तल करण्यास, कत्तलीसाठी वाहतुक करणे, कत्तलीसाठी जनावरे एकत्र जमा करणेस मनाई असताना देखील यातील टोळी प्रमुख व टोळी सदस्य हे गोवंशीय जनावरांची कत्तलीसाठी वाहतुक करताना आढळून आल्यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत.

फलटण शहर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंतकुमार शहा यांनी सदर टोळीविरुध्द महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सातारा जिल्हयातुन तसेच सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, व पुणे जिल्हयातील बारामती व पुरंदर तालुका हद्दीतुन दोन वर्षे तडीपार करणेबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक सातारा यांचेकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी राहुल आर धस, उपविभागीय पोलिस अधिकारी, फलटण विभाग फलटण यांनी केली होती.

सदर टोळीतील व्यक्तींवर दाखल असलेल्या गुन्हयांमध्ये त्यांचेवर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करुनही त्यांचेवर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. या टोळीमधील व्यक्ती हे फलटण तसेच परिसरामध्ये सातत्याने गुन्हे करीत होते, त्यांचेवर कायदयाचा कोणताच धाक न राहील्यामुळे फलटण तालुका परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामन्य जनतेमधुन कडक कारवाई करणेची मागणी होत होती.

समीर शेख, हद्दपार प्राधिकरण तथा पोलिस अधीक्षक सातारा यांच्या समोर टोळी प्रमुख १) तय्यच आदम कुरेशी २) आरीस गफुर कुरेशी, ३) बिलाल रफिक कुरेशी, ४) झिशान ऊर्फ दिशान इमाम बेपारी ऊर्फ कुरेशी, ५) आबु ऊर्फ अल्ताब अफसर कुरेशी, (सर्व रा. कुरेशीनगर फलटण जि-सातारा) यांची सुनावणी होवुन त्यांनी सदर टोळीस महाराष्ट्र पोलिस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्ह्यातून तसेच सोलापुर जिल्हयातील माळशिरस तालुका, व पुणे जिल्ह्यातील बारामती व पुरंदर तालुका हद्दीतुन दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत करण्यात आला आहे.

नोव्हेंबर २०२२ पासुन मपोकाक ५५ प्रमाणे ३३ उपद्रवी टोळयांमधील १०८ इसमांना, मपोकाक ५६ प्रमाणे ३८ इसमांना, मपोकाक ५७ प्रमाणे ४ व्यक्तींना असे एकुण १५० व्यक्तीविरुद्ध तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असुन सातारा जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरीता सातारा जिल्हयातील सराईत गुन्हेगारांचेविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करणेत येणार आहेत. या कामी हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्या वतीने वैशाली कडुकर, अपर पोलिस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, पो.हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो.कॉ. केतन शिंदे, म.पो.कॉ. अनुराधा सणस, फलटण शहर पोलिस ठाणेचे पो.हवा बापु धायगुडे, सचिन जगताप, पो.कों जितेंद्र टिके, यांनी योग्य पुरावा सादर केला आहे.

error: Content is protected !!