फलटण :- फलटण – कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, राजे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्ता संवाद मेळावा हा शुक्रवार दि. २९ नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता कोळकी (फलटण) येथील अनंत मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला असून या संवाद मेळाव्यास उपस्थित राहण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, राजे गटाकडून करण्यात आले आहे.
या आयोजित संवाद मेळाव्यास पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यासाठी माजी आमदार दीपक चव्हाण, फलटण बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, राजे गटाकडून पुढील काही महिन्यात होणाऱ्या नागरी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने तसेच विधानसभेत आलेल्या पराभवाच्या अनुषंगाने विचारमंथन केले जाणार आहे. सदर या मेळाव्याकडे संपुर्ण फलटण तालुक्याचे लक्ष लागले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्ष, राजे गटाकडून नागरी स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोणते निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.