महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क फलटण :- गेल्या अनेक दिवसापासून फलटण महावितरण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या फलटण तालुक्यातील वीज वितरण व पुरवठा बाबत विविध तक्रारीचा ओघ वाढला असून या अनुषंगाने आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय फलटण येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दिनांक १० डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ४ वाजता फलटण तालुक्यातील ट्रान्सफॉर्मर चोरी व त्यामुळे शेतकऱ्यांना लाईट नसलेने शेतास पाणी देण्यास येणाऱ्या अडचणी, शेतकरी बांधवाना देण्यात आलेले लाईटचे वेळापत्रक व ईतर महावितरण कंपनीच्या संदर्भातील अडचणी बाबत महावितरण कंपनीचे फलटण शहर, तालुका, व लोणंद येथील अधिकारी तसेच महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी,तहसीलदार व पोलिस विभागातील , उपविभागीय पोलिस अधिकारी, फलटण शहर, ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी यांची संयुक्त बैठक आमदार सचिन पाटील व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय फलटण येथे आयोजीत केली आहे.