महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण : – फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणच्या महिला संघाने कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले असून, या यशाबद्दल संघातील खेळाडू व त्यांचे मार्गदर्शक शिक्षकांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (जि.रायगड) अंतर्गत कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धा २०२४ चे आयोजन संजीवन अभियांत्रिकी महाविद्यालय, पन्हाळा जि.कोल्हापूर येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटणच्या महिला संघाने कोल्हापूर विभागीय व्हॉलीबॉल स्पर्धेचे उपविजेतेपद पटकाविले. कोल्हापूर विभागामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या पाच जिल्ह्यांतील संघांनी सहभाग घेतला होता. अंतिम सामना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, सिंधुदुर्ग संघाबरोबर अतिशय रंगतदार व संघर्षमय झाला.
अभियांत्रिकी महाविद्यालय, फलटण संघाने उपविजेतेपद मिळविलेल्या संघात. कु. आदिती राऊत,(कर्णधार) कु.माया ढवळे,कु. शर्वरी कचरे, कु.नंदिनी पवार,कु. स्नेहल तरटे, कु. दीक्षा गायकवाड, कु. अनुजा निंबाळकर, कु.शोभा जाधव, कु.श्रद्धा राऊत, कु. अंजली पवार ,कु.गीतांजली जाधव, कु.आरती राऊत या खेळाडूंचा समावेश होता. या संघाला शारीरिक शिक्षण संचालक प्रा. टी. एम. शेंडगे यांचे मार्गदर्शन लाभले.
या उपविजेत्या संघाचे जिल्ह्याचे नेते व फलटण एज्युकेशन सोसायटी, फलटणचे अध्यक्ष आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फ.ए.सो. क्रीडा समितीचे अध्यक्ष शिवाजीराव घोरपडे, फ.ए.सोसायटीचे सर्व गव्हर्निंग कौन्सिल सदस्य आणि फ.ए.सोसायटीचे प्रशासन अधिकारी अरविंद निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाँ.एन.जी.नार्वे, फ.ए.सो.क्रीडा समितीचे सर्व सदस्य, महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राध्यापकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.