महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
खंडाळा :- खंडाळा – वाठार कॉलनी फाटा ते वीर रस्त्याला साईडपट्ट्या नसल्याने व सतत ट्रॅफिक असल्यामुळे व ह्या रस्त्याला साईड पट्ट्या नसल्यामुळे मालवाहतूक गाडी चालक रस्ता सोडून खाली गाडी घेत नसल्यामुळे अनेकदा वाहन चालकांमध्ये वादावादी होण्याचे प्रकार सतत घडत आहेत . तसेच अपघात देखील होत आहेत.

गेल्या २-३ वर्षापासून सातत्याने ही परिस्थितीला प्रवाशांना व स्थानिकांना सामोरे जावे लागत आहे.वाठार कॉलनी ते सासवड रस्त्याला वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थानला देखील भाविकांची सातत्याने याच रस्त्याने वर्दळ होत असते, त्याचप्रमाणे या रस्त्यावरून ऊस वाहतुकीचे ट्रॅक्टर व ट्रक मोठया प्रमाणात वाहतूक होत असते, अशातच या रस्त्याला साईडपट्ट्या नसल्याने गाडी कोणी रस्त्यावरून खाली घ्यायची यावरून सतत वाद होत आहेत.

बांधकाम प्रशासनाकडून या समसेकडे जाणुन बुजुन दुर्लक्ष्य होत आहे का ? असा प्रश्न येथील नागरिकांना पडत आहे. तरी बांधकाम विभाग प्रशासनाने बघ्याची भूमिका न घेता जनतेचा त्रास कसा कमी होईल याकडे लक्ष द्यावे व आपण जनतेचे सेवक आहोत याचे भान ठेवावे अशा नागरिकांकडून प्रतिक्रिया येत आहे.