श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र वीर अध्यक्षपदी राजेंद्र धुमाळ तर उपाध्यक्षपदी अमोल धुमाळ यांची निवड

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

पुरंदर – श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट श्रीक्षेत्र वीर येथील देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेंद्र धुमाळ, उपाध्यक्षपदी अमोल धुमाळ यांनी एकमताने निवड करण्यात आली, तसेच अमोल धोंडीबा धुमाळ यांची खजिनदार पदी आणि काशिनाथ धुमाळ यांची सचिव पदी निवड करण्यात आली.

श्रीनाथ म्हस्कोबा सांस्कृतीक भवन येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाविक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सभेमद्ये सर्वांच्या एकमताने ही निवड करण्यात आली. यावेळी सुनिल धुमाळ, विराज धुमाळ, श्रीकांत थिटे, बाळासाहेब समगिर, जयवंत सोनावणे, प्रमिला देशमुख, अल्का जाधव यांची विश्वस्तपदी निवड करण्यात आली.

श्रीनाथ म्हस्कोबा देवस्थान ट्रस्ट आणि कैकाडी समाजाच्या माध्यमातून रविवारी (दिनांक १५) श्रीनाथ म्हस्कोबा मंदिराच्या दर्शनी भागातील दरवाज्याचे चांदीचे काम आणि राजिकदेवीचा मुखवटा, पादुका यांचा अर्पण सोहळा आयोजित केला असून, त्यादिवशी भैरवचंडी होम संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे योगी निरंजननाथ महाराज यांच्या उपस्थिती मध्ये होणार आहे. त्याप्रसंगी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. भाविकांनी या सोहळ्याचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे देवस्थान ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.

error: Content is protected !!