परभणी येथील विटंबना प्रकरणी फलटण येथे निषेध मोर्चाचे आयोजन

महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क

फलटण :- भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर द्वारा लिखित भारतीय संविधानाची परभणी मध्ये विटंबना करणाऱ्या कृत्याचा निषेध व त्यासोबतच न्यायालयीन कोठडीत असलेल्या विधी अभ्यासक्रमातील विद्यार्थी दिवंगत सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी यांचा न्यायालय कस्टडीत झालेल्या मृत्यू प्रकरणी फलटण येथे निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, परभणी येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची एका व्यक्तीने विटंबना केली त्याच्या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्र भर आंदोलने झाली आंदोलन झाल्या नंतरून त्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन पोलीस विभागाकडून करण्यात आले त्या वेळी पँथर सोमनाथ सूर्यवंशी यांना ही अटक केली होती.न्यायालय कस्टडीत भीम योद्धाचा जबर मारहाणीमुळे मृत्यू झाला होता.

त्याच्या मारेकरांना अटक करून कार्यवाही करण्याबाबत फलटण शहरामध्ये संविधानीक मार्गाने सर्व संविधान प्रेमीच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात येणार असून सर्वांनी उद्या दिनांक १८ रोजी सकाळी १०:३० वाजता मंगळवार पेठ येथे उपस्थित राहावे. सदरील मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर मंदिर मंगळवार पेठ फलटण येथून निघणार आहे. तरी फलटण शहर व तालुक्यातील सर्व बौद्ध समाजातील भीम सैनिकांनी या मोर्चामध्ये सहभाग घेऊन समाजाच्या पाठीमागे उभा राहून झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बौद्ध समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

error: Content is protected !!