वाई :- परभणीतील आंदोलनाचा सीसीटीव्हीच्या आधारे उच्चस्तरीय तपास करून भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोलीस कोठडीतील मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी यांचे तात्काळ निलंबन करण्यासाठी आज वाई भिम अनुयायांच्या वतीने शहरात मोठी निषेध रॅली काढण्यात आली.

परभणीत संविधान अवमान घटनेच्या निषेध आंदोलनानंतर प्रशासनाने बऱ्याच स्त्री पुरुष विद्यार्थी आंदोलकांना कोंम्बिंग ऑपरेशन करून ताब्यात घेऊन अमानुषपणे मारहाण करत त्यांचे शैक्षणिक भविष्य उध्वस्त करण्याच्या हेतूने गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून आंदोलकांवर बळाचा वापर करत दडपशाही करत आंदोलन चिरडले. विद्यार्थ्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करून न्यायालयीन कोठडीत डांबून ठेवले ज्यामध्ये कायद्याचा अभ्यास करणारा विद्यार्थी सोमनाथ सूर्यवंशी याचा कोठडीमध्ये मृत्यू झाला.
आंदोलनकर्त्या व्यक्तीचा अशा संशयास्पद पद्धतीने न्यायालयीन कोठडीत मृत्यू होणे ही खूप गंभीर बाब असल्याचे म्हणणे येत आहे. या मृत्यू नंतर प्रशासन किंवा सरकार या मधील कोणत्याच अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांनी सरकारच्या वतीने खुलासा केला नाही. सदर मृत्यू यासाठी कोणी अधिकारी जबाबदार नसेल तर त्याचा खुलासा होणे गरजेचे असते मात्र तसे काहीच झाले नाही. यामुळे महाराष्ट्रातील संविधान प्रेमी यांच्या मध्ये सरकार प्रति मोठी अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे.
यामुळे राज्यातील वातावरण चिघळले आहे यात शंका नाही. येणाऱ्या काळात अशीच परिस्थिती राहिली तर हे आंदोलन अधिक चिघळणार. या निवेदनाद्वारे आम्ही अशी मागणी करतो की सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूस जबाबदार मारहाण केलेल्या अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबित करावे व सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला सरकारद्वारे आर्थिक मदत करून कुटुंबाचे पुनर्वसन करावे. त्याचबरोबर भारतामध्ये राहून ज्या व्यक्तीस भारतीय संविधान मान्य नसेल त्याचे नागरिकत्व रद्द करावे.

तसेच संविधानाचा अवमान करणाऱ्यावर राष्ट्रद्रोह अंतर्गत गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन आम्ही आपणास देत आहोत येणाऱ्या काळात उद्रेक होऊन असे न झाल्यास सातारा जिल्ह्यातील आंबेडकरवादी समाज एकत्र येऊन जिल्हाभर आंदोलन हे आपणास या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो.या आंदोलनास श्री स्वप्निल भाई गायकवाड, जगदीश भाई कांबळे, संतोष तात्या गायकवाड, श्रीकांत निकाळजे, रुपेश मिसळ, मधुकर भिसे, रामा भोसले, चंद्रसेन गायकवाड, सूर्यकांत गायकवाड, बाजिगर इनामदार, सूर्यकांत गायकवाड, अविनाश बनसोडे, अमर वाघमारे, महादेव शेलार, सागर शिंदे, राजेंद्र सोनावणे, अजित कांबळे, प्रणित मोरे, आनंदा गायकवाड, अनिल शेलार व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते