फलटण:- कोळकीत राजे गटाला धक्का बसला असून मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थितीत राजे गटाचे कोळकी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंह निंबाळकर उर्फ बबलू भैय्या व मा. तंटामुक्ती समिती चे अधयक्ष , राष्ट्रवादी सामजिक न्याय विभाग तालुका अध्यक्ष राजन खिलारे , निरंजन निंबाळकर यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश झाला.
यावेळी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी त्यांचे स्वागत केले. कोळकी चे विकासासाठी निधी कमी पडु देणार नाही अशी ग्वाही यावेळी मा. खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी दिली. यावेळी युवा नेते अभिजीत नाईक निंबाळकर, जिल्हा सरचिटणीस जयकुमार शिंदे, मा. जिल्हा परिषद माणिकराव सोनवलकर, बाळासाहेब काशिद, रणजितसिह भोसले, रणजीत जाधव, मंगेश नाळे, रियाज इनामदार उपस्थित होते.