वाई :- गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने पद्मभूषण कै. आबासाहेब तथा भालचंद्र गरवारे यांची १२१ जयंती रक्तदान शिबीराने साजरी करण्यात आली. रक्तदान शिबिरात २५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. कै. आबासाहेब गरवारे यांच्या जयंती निमित्त्त कंपनीमध्ये दरवर्षी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येते.
या वर्षीही रक्तदान आयोजित करण्यात आले होते. प्रारंभी जनरल मॅनेजर महेंद्र रुद्ररुपु, चंद्रशेखर बधाने, मॅनेजर अंशुमन जगदाळे, रक्तपेढीचे चेअरमन महेशकुमार भाेसले यांच्याहस्ते कै. आबासाहेब गरवारे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. याप्रसंगी कामगार संघटनेचे अध्यक्ष संजय म्हस्के , सेक्रटरी अर्जुन सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुण शिबिराची सुरुवात करण्यात आली. हे रक्तदान शिबीर बालाजी रक्तपेढी सातारा यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते. पहिल्यांदाच रक्तदान शिबिरात २५१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिरात उत्स्फूर्तपणाने सर्व रक्तदात्यांना सहभाग घेतला. त्याबद्दल प्रत्येक रक्तदात्यास प्रशस्तिपत्रक व भेटवस्तू देण्यात आली. रक्तदान शिबिरात कंपनीतील सर्व कर्मचारी व कामगार मोठ्या संख्येने सहभाग झाले हाेते.