फलटण :- फलटण तालुक्यातील गावातील पारापासून ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत ई-पिक पाहणी बाबत जनजागृती करून तातडीने ई-पिक पाहणी नोंद करण्यासाठी संपुर्ण महसूल यंत्रणा कामाला लागली असून उपविभागीय अधिकारी सचिन ढोले, तहसिलदार डॉ अभिजित जाधव, मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यासह संपूर्ण महसूल व्यवस्था ई-पिक पाहणी बाबत गावागावात जनजागृती करत आहे.

दिनांक १५ जानेवारी ही रब्बी हंगाम ई-पिक पाहणी ची अंतिम मुदत होती महसूल विभागाने यापूर्वीच ई-पिक पाहणी बाबत जनजागृती करत चांगल्या प्रकारे नोंदी केल्या असून जे शेतकरी आज अखेर यापासून नोंदी करण्याचे राहिले आहेत त्यांच्यापर्यंत महसुल कर्मचाऱ्यांनी पोहोचून ई-पिक पाहणी बाबत जनजागृती करत ई-पिक पाहणीच्या नोंदी करण्याचे काम मोठया प्रमाणावर तालुक्यात सुरू आहे.उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव तसेच विविध गावचे मंडल अधिकारी, तलाठी, कोतवाल यासह संपूर्ण महसूल व्यवस्था ई-पिक पाहणी बाबत गावागावात जनजागृती करत आहे.

विविध गावात ई-पिक पाहणी बाबत जनजागृती करत असताना उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत महसुल कर्मचाऱ्यांच्या मार्फतई-पिक पाहणीच्या नोंदी करण्याचे करत आहेत. विविध गावात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन उपविभागीय अधिकारी सचिन ढोले व तहसिलदार अभिजित जाधव स्वतः शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहेत.विविध गावामध्ये शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असताना ई-पिक पाहणी ॲपवर शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची नोंद केल्यास आपत्तीच्या काळात याचा अधिक फायदा होणार आहे. आपत्तीमुळे होणारे नुकसान याची आकडेवारी निश्चित करण्यास मदत होईल. यामुळे मदत देणे ही सोईचे होईल. तसेच शेतकऱ्यांना विमा, नुकसान भरपाई देणे शासनाला सोयीचे होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनीही ई-पीक पाहणी ॲपवर आपल्या पिकांची नोंद करावी असे उपविभागीय अधिकारी सचिन ढोले यांनी शेतकऱ्यांना सांगितले.
‘‘राज्यात अतिवृष्टीमुळे अथवा दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे अशा प्रकारच्या योजनेतून शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, हा या योजनेमागचा हेतू आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकरी त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. नैसर्गिक आपत्ती व इतर कारणांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे हा उद्देश आहे.’’ शेतकरी बांधवांनी महसुल कर्मचाऱ्यांच्या मार्फत ई पीक पाहणी अंतर्गत पिकाची नोंदणी करून घ्यावी असे तहसिलदार अभिजित जाधव यांनी शेतकऱ्यांना सांगितले.