लोणंद – लोणंद शहरांमध्ये बाजार तळ येथे १ ते ५ फेब्रुवारीला शरद कृषी महोत्सवाचे भव्य उद्घाटन व शेतकरी मेळावा होणारा असून २ फेब्रुवारी रोजी सकाळी सकाळी १० वाजता खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते होणार असल्याची माहिती निमंत्रक डॉ.नितीन सावंत यांनी दिली.

या शरद कृषी महोत्सवात २५० स्टॉलचे भव्य प्रदर्शन खासाकर्षण जगातील सर्वात बुटकी महेश असून १ फेब्रुवारी कृषी दिंडी सकाळी नऊ वाजता होणार आहे, २ फेब्रुवारी युथ फेस्टिवल होणार आहे आणि पाच फेब्रुवारी ला समारोप व सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रमाने शरद कृषी महोत्सव मोठ्या दिमाखात साजरा होत आहे, तरी सातारा जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेऊन बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन डॉ.नितीन सावंत यांनी केले आहे.
