वाठार निंबाळकर अनधिकृत विहीर प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी

प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँक संरक्षण भिंतीला गेलेले तडे

फलटण – वाठार निंबाळकर येथील एका शेतकऱ्यांने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँकलगत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांना हाताशी धरून विनापरवाना अनधिकृतपणे विहीर काढण्यास घेतल्या प्रकरणी सबंधित शासकीय अधिकारी व कर्मचारी, फोकलेन चालक-मालक व संबधित शेतकरी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून फोकलेन जप्त करून कारवाई करण्याची मागणी वाठार निंबाळकर येथील ग्रामस्थांनी केली आहे.

वाठार निंबाळकर येथील ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, वाठार निंबाळकर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँकलगत विहीर घेण्यास निर्बंध घातला असतानाही भूजल अधिनियम तरतुदींचे उल्लंघन करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांना हाताशी धरून संबधित शेतकरी यांनी फोकलेनच्या साहाय्याने कोणत्याही शासकीय विभागाची पूर्व परवानगी न घेता विहीर खुदाई केली आहे. पिण्याच्या साठवणूक टँकलगत विहित घेत असल्याचे ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना कळवूनही याबाबत कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही.

सदरच्या विहिरीच्या कामामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँक संरक्षण भिंतीला गेलेले तडे गेले असून मोठे नुकसान प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेचे झाले आहे.फलटण तालुक्‍यात भूजल अधिनियम अंतर्गत असणाऱ्या तरतुदीस हरताळ फासत विहीर घेण्याचा सपाटा सुरूच असल्याचे चित्र आहे त्यामुळे भूजलपातळी खालावण्यास भरमसाट विहिरी हेही एक कारण आहे. फलटण तालुक्‍यात मागील काळात दुष्काळी परिस्थिती भीषण होती. शासनाने दुष्काळी पार्श्वभूमीवर विहिरी घेण्यास निर्बंध घातले आहेत. शिवाय विहीर घेण्यासाठी संबंधिताने पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक केले आहे; परंतु फलटण तालुक्‍यात या आदेशाला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे. अनेकांनी नियमबाह्य विहिरी घेण्यास सुरवात केली आहे.

शासकीय सार्वजनिक पाणी साठवण टँकलगत व विहिरीलगत व ईतर जलस्त्रोत लगत ५०० मीटर अंतराच्या आत विहिरी सर्रास घेतल्या जात असून, त्यातून आधीच खालावलेली भूजल पातळी अधिकच धोक्‍याकडे जाण्याची शक्‍यता आहे.सध्याही सर्वाधिक विहिरी विनापरवानगी घेतल्या जात असल्याचे दिसून येत आहे. शेतीतही विहिरी व बोअरवेल घेण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रशासकीय पातळीवर यासाठी सक्षम यंत्रणा नसल्याने भविष्यात हे प्रमाण वाढत जाईल, अशी स्थिती आहे. विहिरी घेण्यासाठी नियमबाह्य फोकलेन मशिनरी वापरल्या जात आहेत.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे पश्चिम भागात नियमबाह्य विहरी व बोअरवेल घेण्याचे व त्याची नोंद सातबारा सदरी करण्याचे प्रमाण वाढले असून त्या यावर वेळीच नियंत्रण न आणल्यास भविष्यात तालुक्यात दुष्काळी परिस्थितीत अधिकच भर पडणार आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्यासह संबधित शेतकरी व फोकलेन गाडी चालक -मालक यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गुन्हा दाखल करत कारवाई करण्याची मागणी

विहिर काढणारा फोकलेन जप्त करण्याची आवश्यकता असून तत्काळ विहीर बुजवून सबंधित शेतकरी व फोकलेन चालक मालक यांच्यावर गुन्हा दाखल करत महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

संरक्षण भिंतीस गेले तडे

विहिरीचे कामामुळे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना पाणी साठवण टँक संरक्षण भिंतीला तडे गेले असून या प्रकरणी संबंध शेतकरी व फोकलेन मालक यांच्याकडून नुकसान भरपाई वसूल करण्याची आवश्यकता

error: Content is protected !!