महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत खंडाळा तालुक्यात शिबिराचे आयोजन

खंडाळा = महाराष्ट्र शासनाच्या शासन आपल्या दारी उपक्रमांतर्गत खंडाळा तालुक्यातील खंडाळा मंडळातील खंडाळा, मावशी, अहिरे , मोर्वे, हरिपूर, बावडा, घाटदरे, हरळी ,धावडवाडी, अजनुज ,अंबरवाडी, आसवली, व कन्हेरी, या १५ गावातील खातेदारांसाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर शिबिराचे आयोजन उपविभागीय अधिकारी वाई राजेंद्र कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मयत खातेदारांच्या वारस नोंदी इतर फेरफार नोंदी संजय गांधी योजना, विविध प्रकारचे दाखले, वाटप ॲग्री स्टॅक योजना, अंतर्गत एकूण ९२४ नागरिकांना सुविधा पुरवण्यात आल्या.

सदर शिबिरास तहसीलदार सो खंडाळा अजित पाटील, निवासी नायब तहसीलदार योगेश चंदनशिवे, महसूल नायब तहसीलदार चेतन मोरे यांचे मार्गदर्शन लाभले. सदर शिबिरास खंडाळा मंडळातील मंडळ अधिकारी तुषार भांगे, ग्राम महसूल अधिकारी अमोल देशमुख, किशोर वाघ, संदीप हुलहुळे , पांडुरंग भिसे, मनीषा जाधव, मोहिनी केंगले, शंकर कोळेकर यांनी भाग घेतला होता. अशा प्रकारे महसूल विभागामार्फत शासन आपल्या दारी कार्यक्रम राबविण्यात आला होता त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

error: Content is protected !!