फलटण – विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांचे चुलत बंधू संजीवराजे नाईक निंबाळकर व रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कम टॅक्स विभागानं छापा टाकला आहे. फलटणसह पुणे व मुंबई येथील घरांवर व गोविंद डेअरी वर सुद्धा छापेमारी करण्यात आली.

संजीवराजे नाईक निंबाळकर हे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करण्यापूर्वीच आयकर विभागानं छापा टाकला गेला आहे. आयकर विभागाचे पथक संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या बंगल्यावर दाखल झाले आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासूनच बंगल्यामध्ये इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांकडून संजीवराजे नाईक निंबाळकर यांची चौकशी सुरू करण्यात आली. बंगल्यामध्ये आत कोणालाही प्रवेश दिला गेला नाही. संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमाणेच रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या घरीही केंद्रीय तपास यंत्रणांच्या धाडी पडल्या आहेत. सकाळी सहा वाजता केंद्रीय तपास यंत्रणांचे अधिकारी छापा टाकण्यासाठी दाखल झालं आहे. या विषयीचं कारण अद्याप अस्पष्ट आहेरघुनाथराजे नाईक निंबाळकर हे आधीपासूनच शरद पवार यांच्या पक्षात आहेत तर संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी निवडणुकीआधी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला होता.संजीवराजे नाईक निंबाळकरांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशापूर्वी मोठी घडामोड झाली आहे.

संजीवराजे नाईक निंबाळकर हे येत्या काही दिवसांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते. त्यापूर्वीच हा छापा टाकण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी साताऱ्यातील राज्यसभा खासदार नितीन पाटील यांच्याशी चर्चेनंतर प्रवेशाचा निर्णय होईल असं म्हटलं होतं.दरम्यान, संजीवराजे निंबाळकरांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी जमली होती त्यांच्याकडून निषेध व्यक्त करण्यात आला. या धाडीचे कारण अद्याप अस्पष्ट असले तरी या घटनेवर कार्यकर्त्यांकडून तीव्र रोष व्यक्त करण्यात आला.

गर्दी करू नका ; खात्याला काम करू द्या
आ. रामराजेंचे स्टेटस या कारवाई विषयी विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे नाईक निंबाळकर यांनी आपल्या व्हाट्सअप स्टेटसच्या माध्यमातून कृपया गर्दी करू नका ; खात्याला काम करू द्या काळजी नसावी अशा प्रकारचा संदेश कार्यकर्त्यांना दिला.
देशाला लाखो रुपये देणारं कुटुंब – रघुनाथराजे नाईक निंबाळकर
रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी संजीवराजे नाईक निंबाळकर आणि त्यांच्या घरावर व गोविंदवर देखील छापा पडल्याची माहिती दिली. ते पुढे म्हणाले, आम्ही इतकी वर्ष राजकारणात आहोत, आजोबा देखील मंत्री होते, पण असं कधी घडलं नव्हतं. देशाला लाखो रुपये देणारं आमचे कुटुंब होतं अशी प्रतिक्रिया रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
आम्ही दोन नंबरच्या विषयात नाही, यामुळं काही डॅमेज होणार नाही. आम्ही राजघराण्यातून येतो त्यामुळं आमच्याकडे काही वेडवाकडं सापडेल, असं वाटत नाही, असं रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले. सत्ताधाऱ्यांची साथ सोडल्यानं छापेमारी सुरु आहे का असं वाटत का असं विचारलं असता तसं काही वाटत नाही. प्रक्रियेचा भाग असेल असं वाटतं किंवा असेल सुद्धा तसं काही कल्पना नाही. आम्ही संस्थान विलीन केलं तेव्हा शासकीय कार्यालयं आमच्याच इमारतीत आहेत. लोकशाहीत सामील झालेलं हे घराणं आहे, असं व्हावं हे दुर्दैव आहे, असं रघुनाथराजे नाईक निंबाळकर म्हणाले.
तालुक्याच्यावतीने या कारवाईचा निषेध – मा.आ. दीपकराव चव्हाण
सदरची कारवाई ही राजकीय स्वरूपाची आहे असे वाटत नाही. आम्ही सर्वजण तालुक्याच्यावतीने या कारवाईचा निषेध करतो अशी प्रतिक्रिया मा. आ. दिपकराव चव्हाण यांनी दिली आहे. अशा पद्धतीने व अशा प्रकारची कारवाई होणे या संस्कृतीत अपेक्षित नाही. कारण गेली तीन पिढ्या राजे कुटुंब राजकारणामध्ये कार्यरत आहेत. आजवरच्या त्यांच्या राजकीय जीवनामध्ये कोणत्याहीप्रकारचा डाग लागलेला नाही. अश्या पद्धतीचे स्वच्छ चारित्र्याचे राजकारण त्यांनी केले असताना, ज्यावेळी अशा पद्धतीची कारवाई होते त्यावेळी निश्चितपणे या तालुक्यातील सर्वसामान्य माणसाला वाईट वाटल्याशिवाय राहणार नाही. ही कारवाई राजकीय आहे की नाही हे सांगता येणार नाही परंतु अशा प्रकारचीकारवाई अपेक्षित नाही. आयकर कीईडी अशा अफवा याबाबत काही सांगता येणार नाही कारण देशात काय चालू आहे हे आपणास माहिती आहे. याचा अर्थ तालुक्यामध्ये तशाच प्रकारची कारवाई आहे काय हे आत्ताच सांगू शकत नाही असे ही मा. आमदार चव्हाण म्हणाले.