मुधोजी क्लब आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी मिश्र स्पर्धेमध्ये डॉ. पूनम पिसाळ व योगेश शेलार यांना विजेतेपद
फलटण :- ७ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या फलटण डॉक्टर्स असोसिएशन आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत फलटण येथील मोरया हॉस्पिटलच्या प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. सौ. पुनम जनार्दन पिसाळ यांनी महिला एकेरी व मिश्र दुहेरी सामन्यात विजेतेपद पटकाविले.

अतिशय उत्कंठपूर्ण झालेल्या अंतिम सामन्यात दोन ही सरळ सेटमध्ये प्रतिस्पर्ध्याला धूळ चारत त्यांनी हे यश संपादन केले आहे. तसेच दिनांक ९ फेब्रुवारी रोजी मुधोजी क्लब तर्फे आयोजित बॅडमिंटन स्पर्धेत मिश्र दुहेरी सामन्यात डॉ. पूनम पिसाळ व योगेश शेलार यांनी मिश्र दुहेरीच्या स्पर्धेत विजेतेपद पटकाविले त्यांच्या या यशाबद्दल फलटण डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व खजिनदार तसेच सर्व सभासदांनी अभिनंदन केले आहे.

