भादे येथे अपघातामध्ये युवक ठार

शिरवळ – दिनांक ९ फेब्रुवारी वार रविवार रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास भादे तालुका खंडाळा गावच्या हद्दीमध्ये अपघात झाला. वॉटर कॉलनी तालुका खंडाळा येथील वेदांत दत्तात्रय पिसाळ (वय १६) हा आर्यन सुनील गायकवाड (वय १६) व सुमित शरद चव्हाण (वय १६) दोघे (राहणार होडी, भादे) या मित्रांसमवेत किरण साळुंखे यांच्या मालकीच्या दुचाकी होंडा होर्नेट (एमएच-११-सीएस-११२८) शिरवळ कडे निघाला होता. हे दुचाकी आणि शिरवळ कडून आलेला डंपर (एमएच-११- डीडी- ३१२९) यांची भादे गावच्या हद्दीत एका चायनीज सेंटर समोर समोर धडक झाली.

त्यामध्ये दुचाकी वरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना शिरवळ येथील खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी वेदांत पिसाळला तपासून मृत घोषित केले. आर्यन गायकवाड ची प्रकृती चिंताजनक झाल्याने, त्याला पुणे येथे खाजगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले. याबाबत शुभम लाड याने फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक नयना कामथे आणि परिविक्षाधिन पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट तपास करत आहेत.

error: Content is protected !!