ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- वाल्मीकीच्या कुशीत वसलेले उधवणे (ता. पाटण) येथील निसर्गरम्य वातावरणात शिक्षण परिषद पार पडली. विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांचे स्वागत केले यावेळी विद्यार्थ्यांनी केलेल्या स्वागताने शिक्षक भारावून गेले.

डाएटने सुचवल्याप्रमाणे सातारा जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची शिक्षण परिषद यापूर्वी महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी व्हायची. मात्र शिक्षक संघटनांनी वारंवार निवेदने दिल्याने डाएटने आता शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस दिले असून यापैकी एका दिवशी शिक्षण परिषद घ्यायची असूनबनपुरी नं. १ केंद्राची शिक्षण परिषद उधवणे येथे झाली. येथील शाळा निसर्गाच्या सान्निध्यात डोंगराच्या पायथ्याशी आहे.

शाळेची स्वच्छता अप्रतिम असून शाळेत सर्व प्रकारचेउपक्रम राबवले जातात. सर्व स्पर्धा परीक्षांचे नियोजन, वाचनासाठी सर्व उपक्रम, लेखनासाठी उपक्रम, ई लर्निंग , टाकावूतून टिकावू केलेल्या वस्तू असे उपक्रम राबवले आहेत. शाळेचे मुख्याध्यापक समाधान खांडेकर व सहकारी महेश साळूंखे हे शिक्षक मन लावून ही कामे करत आहेत.शिक्षण परिषदेत शाळेने उपस्थित सर्व शिक्षकांना भेटवस्तू दिल्या.

यावेळी केंद्रप्रमुख प्रविण गायकवाड, केंद्रसंचालक अशोक पाटील, पाटण शिक्षक सोसायटीचे संचालक सूर्यकांत मोकाशी तंबाखूमुक्त शाळेचे राज्य समन्वयक विजय गवळी, पदवीधर मुख्याध्यापक ज्येष्ठ शिक्षिका रेखाताई मोकाशी, विद्याराणी लटके, साळूंखे सर यांच्यासह केंद्रातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक यांची उपस्थिती होती. यावेळी गांवातील दानशूर सचिनशेठ साळूंखे, माजी सरपंच विजयराव साळूंखे, शोभाताई मोहीते यांनी विद्य र्थ्यांना दप्तरवाटप केले. तसेच संत गाडगेबाबा यांच्या भितीपत्रकाचे उदघाटण करण्यात आले. स्वागत विनायक काटकर व अर्जुन कणसे यांनी केले. आभार समाधान खांडेकर यांनी मानले.