ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- भारतीय बँकेच्या धोरणानुसार दरवर्षी फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आर्थिक साक्षरता सप्ताह देशभर आहात साजरा केला जातो या सप्ताहाच्या निमित्ताने मौजे ढेबेवाडी येथे भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया मुंबई व जिल्हा अग्रणी बँक सातारा या दोघांच्या संयुक्त विद्यमाने महिलांकरता आर्थिक साक्षरता मेळावा आयोजित केला होता.

याप्रसंगी भारतीय बँकेचे जनरल मॅनेजर अमित सिन्हा उपस्थित होते तसेच बँक ऑफ महाराष्ट्राचे आंचल प्रबंधक सौरभ सिंग रिझर्व बँक ऑफ इंडियाचे विजय कोरडे व जिल्हा ग्रामीण व्यवस्थापक नितीन तळपे पंचायत समितीच्या समन्वयक प्रतिभा चिंचकर , बँक सखी उज्वला साबळे, ( मं. कोळे ) प्रभागातील सर्व सी आर पी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.

यावेळी बोलताना सिन्हा म्हणाले की,भारतातील महिला करिता विशेष आर्थिक सप्ताह राबवत आहे. या सप्ताहाची थीम आर्थिक शहाणपण व महिलांची समृद्धी असे आहे छोट्या छोट्या आर्थिक गोष्टींचे योग्य नियोजन केले असता महिला आपली वाटचाल समृद्धीकडे करू शकतात याकरता बँकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे बँकांच्या माध्यमातून उद्योग व्यवसायासाठी छोटे-मोठे लघु उद्योगाकरिता आवश्यक कर्ज पुरवठा योग्य प्रकारे झाल्यास महिलांना स्वतःच्या पायावरती उभे राहण्यास खूप मोठी मदत होईल तसेच घेतलेले कर्ज योग्य वेळी फेडणे याच्यामुळे आपल्याला पुढील अनेक कर्जाच्या संधी उपलब्ध होतील.

यावेळी आर्थिक साक्षरते विषयी माहिती देण्यात आली सौरभ सिंग यांनी जीवन ज्योती जीवन सुरक्षा अटल पेन्शन योजना इत्यादी योजनेविषयी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नितीन तळपे यांनी केले, तर सूत्रसंचालन नितिराज साबळे यांनी केले.