ढेबेवाडी परिसरात वणव्याची मालिका सुरुच

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- गेले काही दिवसापासुन ढेबेवाडी परिसरात रोज कुठेना कुठे तरी वणवा पेटताना दिसत आहे. असाच वणवा ढेबेवाडीच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या पळशीचा डोंगर या नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोगंरावर सायंकाळी वणवा लागल्याचा दिसुन आला.

डोंगर भागामध्ये घनदाट झाडी असल्याने त्याठिकाणी अनेक जातीचे कीटक,पशु, पक्षी यांच वास्तव्य फार मोठ्या प्रमाणात आहे . त्याच प्रमाणे अनेक प्रकारच्या औषधी वनस्पती अडुळसा, रक्तचंदन,निर्गुडी हे वणव्यामध्ये सापडून वणसंपदा पुर्णपणे नष्ट होत आहे. जानेवारी ते मे महिना जनावरांना चरण्यासाठी शेतकरी डोंगरपटारावर घेऊन जातात .मात्र वणव्यामुळे जणावरांचा चारा गवत जळुन पुर्ण खाक होत आहे.त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा देखील प्रश्न गंभीर होत आहे. ढेबेवाडी विभागात वन विभागाचे कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने प्रत्येक ठिकाणी वन कर्मचारी पोहचेलच असे नाही. त्यामुळे डोंगर परिसर वणव्यापासुन वाचवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.हे काम केवळ वनविभागाचे आहे असे समजुन चालणार नाही वणव्या पासुन डोंगर वाचवने ही सर्वांची जबाबदारी आहे.

error: Content is protected !!