बारामती:- इंदापूर येथील खोरोची मधील रामोशी समाजातील कै.उत्तम जालिंदर जाधव या युवकांच्या झालेल्या निर्घृण हत्येच्या निषेधार्थ जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा व बारामती तालुका यांच्या वतीने बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांना विविध मागण्याचे लेखी स्वरूपाचे निवेदन देण्यात आले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इंदापूर येथील खोरोची या गावातील मागच्या आठवड्यात रामोशी समाजातील कै.उत्तम जालिंदर जाधव या ३४ वर्षीय युवकांची त्याच गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या दहा ते बारा युवकांनी आज्ञातस्थळी एकट्याला गाठून भर दिवसा निर्घृण अशी हत्या करण्यात आली. झालेल्या हत्येच्या निषेधार्थ लोकनेते दौलत नाना शितोळे यांच्या आदेशानुसार व जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने यांच्या नेतृत्वाखाली तसेच जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा व बारामती तालुका यांच्या वतीने बारामती उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.सुदर्शन राठोड यांची भेट घेऊन या विषयावर वर सविस्तर अशी चर्चा करण्यात आली व लेखी स्वरूपाचे निवेदन देण्यात आले.

यामध्ये उर्वरित आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावे,सदर खटला जलदगती न्यायालयात चालवण्यात येऊन आरोपींना त्वरित फाशी शिक्षा देण्यात यावी,तसेच मयत व्यक्तीच्या कुटुंबातील एका शिक्षित व्यक्तीस सरकारी नोकरीत सामावुन घेऊन पीडित कुटूंबाचे पुनर्वसन करण्यात यावे.सदर गुन्हयातील सर्व आरोपींवरती या अगोदर पण पुणे सातारा इंदापूर बारामती सोलापूर या ठिकाणी गंभीर गुन्हे दाखल आहेत या सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती च्या आरोपींची सखोल चौकशी करून मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी.या सर्व आरोपीं कडुन पीडित कुटुंबीयांना दहशत माजवुन भिती दाखवण्याची दाट शक्यता आहे त्यामुळे पिडीत कुटूंब हे भयभित असुन त्याना तातडीने पोलिस संरक्षण देण्यात यावे अशा विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.सदर गुन्हेगार व त्या भागातील राजकीय प्रस्थापित लोकांकडून रामोशी बेरड समाजातील कुटूंबाना जाणीवपूर्वक अशा पद्धतीने अन्याय केला जात आहे.

तरी बेरड रामोशी समाजाचा खूप मोठा इतिहास आहे आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक गुप्तहेर खात्याचे बहिर्जी नाईक यांचा वारसा असलेल्या रामोशी बेरड समाजाचा इतिहास पाहता या मागण्याचा सहानूभुतीपूर्वक विचार करावा.ह्या आरोपींना लवकरात लवकर पकडुन योग्य ती कारवाई नाही करण्यात आली तर संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल असा इशारा या निमित्ताने देण्यात आला.यावेळी जय मल्हार क्रांती संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,बारामती तालुका अध्यक्ष महेंद्र भंडलकर,चांगदेव भंडलकर,पोलीस पाटील नवनाथ मदने,वाकी गावचे विद्यमान सरपंच किसनराव बोडरे,नानासो जाधव प्रवीण मदने,आनंदा खोमणे,नरेश खोमणे,सागर खोमणे नवनाथ माकर,नितीन माकर,किरण चव्हाण,सोनु माकर,योगेश मदने,रोहीत जाधव,ज्ञानेश्वर बोडरे आदि पदाधिकारी व समाज बांधव उपस्थित होते.