ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) : – ढेबेवाडी विभागातील अंब्रुळकरवाडी ता.पाटण येथील डोंगराला लागलेला वणवा विझवताना तुकाराम शिताराम सावंत वय वर्ष ६४ सध्या राहणार भिमनगर ढेबेवाडी यांचा आगीत होरपळुन मृत्यू झाला आहे.

गेले काही दिवसापासुन ढेबेवाडी परीसरात कुठेना कुठे तरी वणवा लागत आहे.तुकाराम शिताराम सावंत हे त्यांच्या खाजगी अंब्याच्या बागेची राखन करत असताना. दुपारी १.३० सुमारास अंब्रुळकरवाडी या डोगंरावर वणवा लागल्याचे दिसुन आले तोच वणवा तुकाराम शिताराम सावंत यांच्या खाजगी शिवारात आंब्याच्या बागेत येत असल्याचे त्यांनी पहाताच ती आग विझवण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी धाव घेतली मात्र वाऱ्याचा वेग जास्त असल्याने आग आंब्याच्या बागेत पसरल्याने तीचा भडका उडाला व त्यातच तुकाराम सावंत यांचा होरपळुन मृत्यू झाला. या घटनेचा अधिक तपास ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्ष प्रवीण धाईंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. मुळे हवालदार करत आहे.