डॉक्टरला हनी ट्रॅप मध्ये अडकवणारी टोळी जेरबंद

शिरवळ:- खंडाळा तालुक्यातील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका प्रतिष्ठित खाजगी डॉक्टरांना हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा व्हिडिओ पाठवून तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी डॉक्टर व त्यांच्या कुटुंबीयांकडे मागणाऱ्या टोळीच्या मुस्क्या शिरवळ पोलिसांनी सापळा रचून आवळल्या आहेत. यामध्ये पैसे घेण्याकरिता आलेल्या दोन युवकांना शिरवळ पोलिसांनी जेरबंद केले असून मुख्य सूत्रधार फरार आहे पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.

याबाबतची पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एका डॉक्टरांचा २ गावांमध्ये दवाखाना आहे. दरम्यान संबंधित डॉक्टर यांच्याकडे काम करीत असलेल्या एका महिलेची नातेवाईक असलेली एक साधारण १९ वर्षीय युवती वैद्यकीय सेवेकरीता असताना अचानकपणे बेपत्ता झाली. याबाबतची बेपत्ता असल्याची तक्रार शिरवळ पोलीस स्टेशनला दाखल झाल्यानंतर काही दिवसांनी डॉक्टर यांच्या मोबाईलवर संबंधित युवती बरोबरचा एक व्हिडिओ पाठवण्यात आला.

त्यानंतर डॉक्टरांना संबंधितांकडून एक रुपयांची मागणी करण्यात आली. यावेळी संबंधित डॉक्टरांना आपल्यावर हनी ट्रॅपचा प्रकार झाला असल्याचे निदर्शनास येताच संबंधित घटना डॉक्टरांनी आपल्या डॉक्टर पत्नींला देत फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल दस यांच्याकडे याबाबतची घटना सांगताच राहुल दस यांनी याबाबतची कल्पना सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांना देत शिरवळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कीर्ती मस्के, पोलीस उपनिरीक्षक सपना दांगट, पोलीस अंमलदार अजित बोराटे, अविनाश बाराळे, सुरज चव्हाण, प्रशांत धुमाळ, दीपक पालेपवाड, नीलिमा भिलारे, स्नेहल शिंगटे च्या पथकाने शिरवळ येथील रामेश्वर मंदिर या ठिकाणी सापळा रचला.

खंडणी स्वीकारण्याकरिता दुचाकी क्रमांक एम एच १२व्ही. एस ५९९८ वरून आलेल्या नितीन नवनाथ प्रधान वय वर्ष २०(मूळ रा. माजलगाव बीड) दत्ता आप्पाराव घुगे वय २४ दोघे रा. शिंदेवाडी ता. खंडाळा (मूळ रा.कारी , ता. कासारगाव जि. लातूर यांना संबंधित डॉक्टर व त्यांच्या पत्नीकडून एक कोटी रकमेपैकी दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहात पकडले. यावेळी पैसे स्वीकारण्यासाठी आलेल्या संबंधितांना शुभम जलान (पूर्ण नाव माहित नाही) हा मुख्य सूत्रधार याबाबत दूरध्वनीद्वारे मार्गदर्शन करीत असल्याचे शिरवळ पोलिसांच्या निदर्शनास आले, यावेळी या घटनेनंतर खंडाळा तालुक्यात खळबळ उडाली असून शिरवळ पोलिसांनी पैसे घेण्यासाठी आलेल्या दोघांना अटक केली आहे.

error: Content is protected !!