दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड ॲकॅडमी साखरवाडी शाळेमध्ये महात्मा ज्योतीराव फुले जयंती उत्साहात साजरी

फलटण:- फलटण तालुक्यातील दि एम्रल्ड हाईट्स प्री स्कूल अँड ॲकॅडमी साखरवाडी शाळेमध्ये शुक्रवार दिनांक 11/04/2025 रोजी महात्मा ज्योतिराव फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.अंजली दत्तात्रय शिंदेमॅडम उपस्थित होत्या. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ,त्यानंतर शाळेच्या शिक्षिका शिरीन मुलाणी मॅडम यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जीवनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच सर्व शिक्षकांनी महात्मा ज्योतिराव फुले यांना विनम्र अभिवादन केले ,अशा प्रकारे महात्मा ज्योतिराव फुले जयंती साजरी करण्यात आली.

हा कार्यक्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अंजली दत्तात्रय शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली झाला , तसेच यावेळी शाळेच्या इन्चार्ज मोनाली कुलकर्णी मॅडम,शिवगंगा पवार, वर्षा खोमणे, पल्लवी भापकर ,शिरीन मुलाणी,अफसाना सय्यद,विद्या भिसे,रोहिणी ठोंबरे, रूपाली बनकर, पुनम शिंदे, सुषमा गायकवाड सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.

error: Content is protected !!