l महाराष्ट्र माझा l फलटण प्रतिनिधी l दि. १६ एप्रिल २०२५ l
फलटण शहरात एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी दोन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी तरुणांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असून याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फलटण शहर पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, पहिल्या गुन्ह्यात दिनांक १४ रोजी सायंकाळी ७:१५ वा चे सुमारास गिरवी नाका ते जाधववाडी जाणारे रोडवर गोळीबार मैदान फलटण येथील गिरीधर क्लासेसचे समोरील वृंदावन बंगल्याचे समोर फिर्यादी रूपाली दिपक जगदाळे ( रा.राजलक्ष्मी अपार्टमेंट, सजाई गार्डन शेजारी फलटण) व त्यांची मुलगी समीरा असे गिरवी नाका ते जाधववाडी जाणारे रोडवर गोळीबार मैदान फलटण येथील गिरीधर क्लासेसचे समोरील वृंदावन बंगल्याचे समोर पोहोचले असता समोरून एका काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून अंदाजे २० ते २५ वर्षे वय असणारे दोन अनोळखी तरुण त्यांच्याजवळ येताच त्यातील पाठीमागे बसलेल्या तरुणाने फिर्यादीच्या गळ्यातील ६० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे चैनमधील १२ ग्रँम ४४० मिली वजनाचे मिनी गंठण त्यामध्ये मध्यभागी उभा मोठा मणी व त्याला लटकन असलेले गंठण हिसकावुन घेवुन ते मोटार सायकलवरून तेथुन पुढे गोळीबार मैदान परिसरात निघुन गेले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास पो.हवा.गणेश सुर्यवंशी करत आहेत.

दुसऱ्या गुन्ह्यात दिनांक १४ रोजी सायंकाळी ७:४५ वाजण्याच्या सुमारास बारवबाग लक्ष्मीनगर फलटण येथे चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या शेजारी स्वामी हाँस्पीटलचे समोर रोडवर यातील फिर्यादी लिलावती सतिश लकडे ( मुळ रा.वडले, ता.फलटण, जि.सातारा सध्या रा.स्वामी विवेकानंदनगर, फलटण) व त्यांची बहीण राहत असलेल्या बंगल्याचे गेट उघडत असताना फिर्यादी यांच्या पाठीमागुन एका काळ्या रंगाच्या मोटारसायकल वरून अंदाजे २० ते २५ वर्षे वय असणारे दोन अनोळखी तरुण फिर्यादीच्या जवळ येताच त्यातील पाठीमागे बसलेल्या तरुणाने फिर्यादीच्या गळ्यातील ५४ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे चैनमधील मिनी गंठण त्यामध्ये मध्यभागी पेंडल असलेले असे २६ ग्रँम वजनाचे गंठण हिसकावुन घेवुन ते मोटार सायकलवरून तेथुन पुढे रिंगरोडच्या दिशेने निघुन गेले. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्याचा अधिक तपास म.पो.हवा.पूनम बोबडे करत आहेत.
