l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २२ एप्रिल २०२५ l
ढेबेवाडी ता.पाटण बाजार पेठेतील नाले तुंबल्याने नाल्यातील दुशीत पाणी बाजार तळावर आल्याने व्यापाऱ्यांची तारंबळा उडाली असून नेमके बाजारात माल घेऊन बसायचे तरी कुठे? असा प्रश्न व्यापाऱ्यांच्या मधून उपस्थीत होत आहे.
ढेबेवाडी ग्रामपंयतीच्या वतीने बाजार तळावरती कचराकुंडी बांधण्यात आली असून त्यातील कचऱ्याची विल्लेवाट देखील लावली जाते. मात्र काही दिवसांनी कचराकुंडीची मोडतोड झाल्याने तेथील कचरा जमीनीवर टाकला जात आहे. हाच कचरा गावातील काही भटकी कुत्रे अन्नाच्या शोधात विसकटत आहे. अशातच नाल्याचे पाणी त्याच कचऱ्यामध्ये येत आहे आहे. त्यामुळे बाजारतळावरील भाग अस्वच्छ व दूषित होत आहे.
बाजारतळावरील अस्वच्छतेमुळे बाहेरील गावावरून येणारे नागरिक यांच्यामध्ये गावातील अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त केली जात आहे. बाजार तळावर खरेदीसाठी येणारे ग्रामस्थ पडलेला कचरा पाहून बाजार तळाकडे पाठ करत आहेत. विक्री करणारे व्यापारी शेतकरी तसेच खरेदीसाठी येणारे ग्रामस्थ यांना या अस्वच्छतेमुळे फार मोठा त्रास होत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
नाले साफ सफाई न झाल्याने ठिक ठिकाणी कचरा , प्लास्टिक पिशव्या यांनी नाले भरले आहेत.त्यामुळे गावामध्ये मच्छरांचे देखील प्रमाण वाढले असुन नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर होण्याची स्थिती निर्माण झाली आहे.ग्रामपंचायतीने तत्काळ बाजारात स्वच्छ करण्यासाठी उपाय योजना आखण्याची गरज असून त्यामुळे याबाबत ग्रामपंचायतीने ठोस उपायोजना करावी अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून व व्यापारी वर्गातुन केली जात आहे.
ढेबेवाडी गावची यात्रा अवघ्या काही दिवसावरच आली असुन गावातील घाणीचे साम्राज्य हठवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाले तुंबल्याने मच्छरचे प्रमाण वाढत आहे .त्यामुळे नागरीकांच्या आरोग्याचा देखील प्रश्न गंभीर होत आहे.
नवाज डांगे – माजी ग्रा. पं.स. ढेबेवाडी