गुढे स्टाँपवरील अपघातात सुपुगडेवाडी येथील युवकाचा जागीच मृत्यू

l महाराष्ट्र माझा l ढेबेवाडी प्रतिनिधी l दि. २५ एप्रिल २०२५ l महेश जाधव

गुढे ता.पाटण येथील कराड ढेबेवाडी रोडवरती गुढे स्टॉप वरील एस. टी पिक अप शेडवरती अँपे रिक्षा (एम.एच 50एम 8573) धडकून कुठरे सुपुगडेवाडी येथील रिक्षा चालक विजय यशवंत सुपुगडे वय 28 हा जाग्यावरतीच मृत्यू झाला.

मिळालेले माहिती नुसार विजय सुपुगडे हा रिक्षा घेऊन ढेबेवाडीहून तळमावळेच्या दिशेने निघालेला होता. रिक्षा चालकाचा रिक्षावरील ताबा सुटल्याने रिक्षा रस्त्याच्या बाजूवरील पिकअप शेडवरती धडकून रिक्षाचालक जाग्यावरतीच ठार झाला. अपघात एवढा भयानक होता की रिक्षाचा चक्काचूर झाला असून उशिरापर्यंत अपघाताची नोंद झाली नव्हती.

error: Content is protected !!