l महाराष्ट्र माझा l वाई प्रतिनिधी l दि.१ मे २०२५ l
२६ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या पद्मश्री शाहीर साबळे सहकारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत सत्ताधारी यांनी घरातील, नात्यातील आणि परगावातील मतांच्या जोरावर आपली सत्ता राखली. ८५०० लोकसंख्या असणाऱ्या गावात फक्त ७७४ इतके मतदार संख्या ज्यामध्ये पारगावात १६५ मतदान असलेल्या या संस्थेच्या निवडणुकीत उच्चांकी असे ६८३ इतके ८८% मतदान झाले. ज्यात सत्ताधारी यांना जवळपास ३५० व विरोधकांना जवळपास २५० इतके मतदान झाले आहे.
जवळपास १०० पेक्षा जास्त मताधिक्याने विरोधकांना हरवण्यात सत्ताधारी यशस्वी झाले. मात्र ज्या पद्धतीने सत्ताधारी यशस्वी झाले आहेत ते समजून घेणे अत्यंत गरजेचे आहे.सत्ताधारी यांना सरासरी पडलेल्या ३५० मतांपैकी १२ उमेदवारांच्या घरात प्रत्येकी १० ते १५ मते म्हणजे जवळपास १२० किंवा त्यापेक्षाही जास्त मतदान आहे म्हणजे जितकी मत यांच्या घरात आहेत तितकी गावच्या एका आळीत पण नाहीत. त्याच बरोबर पसरणी व्यतिरिक्त पारगावात व संचालकांच्या नात्यागोत्यात असणारे मतदान १५० पेक्षाही जास्त आहे.
ज्यात प्रामुख्याने एकसर व चिखली या ठिकाणी सर्वाधिक मताधिक्य आहे ज्याठिकाणी सत्ताधारी यांनी २ उमेदवार दिले होते मात्र विरोधक यांना एकही उमेदवार देता आला नाही. त्यामुळे गावाबाहेर असणाऱ्या १५० मतांपैकी सत्ताधारी यांना जवळपास १२०हून अधिक मतदान झाले असण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सत्ताधारी यांना ३५० पैकी १२० घरातील व १२० बाहेर गावातील असे जवळपास २४० मतदान झाले त्यामुळे सत्ताधारी यांना पसरणी गावात फक्त १०० ते १२० इतकेच मतदान झाले आहे यात शंकाच नाही.
याउलट विरोधकांना संस्थेच्या हुकूमशाही प्रवृत्ती विरोधात पसरणी गावातील सामान्य सभासदांनी भरपूर साथ दिली विरोधकांना पडलेल्या जवळपास २५० मतांपैकी बाहेरगावातून फक्त २५ ते ३० मतदान झाले मात्र पसरणी गावातील जवळपास २२० सामान्य सभासदांनी योग्य साथ दिली. विरोधकांकडे असणारे उमेदवार अतिशय सामान्य कुटुंब पार्श्वभूमी असणारे होते ज्यात प्रत्येक उमेदवार यांच्या घरात फक्त १ किंवा जास्तीत जास्त ३ इतके मतदान आहे. त्यामुळे नैतिक दृष्ट्या गावात विरोधकांचा विजयच झाला आहे.
३५ वर्ष संस्था ताब्यात स्वतःच्या घरात मोठ्या प्रमाणात सभासद प्रत्येक पंचवार्षिक मध्ये केली जाणारी जाणीवपूर्वक सामान्य सभासदांची घट यामुळे सत्ताधारी तरले आहेत अन्यथा वेगळाच निकाल दिसला असता. गावातील सत्ताधारी यांचे घरातील व गावातील मतदान आहे २२० इतकेच आहे तर विरोधक यांचे मताधिक्य सुध्दा २२० ते २३० इतकेच आहे.
त्यामुळे आज जरी सत्ताधारी यांचा विजय झाला असेल तरी विरोधक यांना गावातून पडलेल्या मताधिक्याने सत्ताधारी हे आपल्या कार्यपद्धतीत बदल करून शेअर्स वाटप करत सामान्य पसरणीकरांच्या मनात त्यांच्या कामाबद्दल निर्माण झालेली शंका याचे निरसन करतात की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात मात्र गावात सत्ताधारी यांना मोठा संघर्ष करावा लागणार आहे यात शंका नाही.