फलटण प्रतिनिधी:-भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष महेंद्र सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांची जिल्हा समनव्य व सनियंत्रण दिशा समितीच्या अशासकीय सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
दिशा समितीचे अध्यक्ष खासदार छत्रपती उदयनराजे भोसले सह. अध्यक्ष खासदार धैर्यशील मोहिते पाटील, सदस्य खासदार नितीनकाका पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा सदस्य दिशा समिती व सचिव म्हणून जिल्हाधिकारी हे काम पाहणार आहेत. केंद्र शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हे कमिटीचे प्रमुख कामे आहेत.
मुख्यता जलजीवन मिशन, प्रधानमंत्री आवास योजना, म.न.रे.गा कामे, प्रधानमंत्री ग्रामसडक योजना, शिक्षण, आरोग्य व विविध योजना राबवणे. इत्यादी विषय कमिटीच्या माध्यमातून जनतेच्या मार्गी लावल्या जातात. दरम्यान महेंद्र सूर्यवंशी (बेडके) यांची सातारा जिल्हा समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा समिती) च्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

