ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :-पंढरपूरची ‘वारी’ हा समता, बंधुता, एकतेचा संदेश देणारा सामाजिक आणि सांस्कृतिक उत्सव आहे. यात कोणत्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा असण्यापूर्वी माणूस असणे आवश्यक बंधनकारक आहे. किंबहुना मूलभूत गरजच आहे.संत साहित्यातून नुसता ‘माणूस’च नाही तर ‘चांगला माणूस’ घडण्याची प्रक्रिया होत असते. जात, धर्म, पंथाच्या पलीकडे जाऊन ‘माणूस’ म्हणून सर्वांना एकत्र करीत समतेचे कार्य वारकरी संप्रदायाने मध्ययुगात केले.

याच आषाढी एकादशीचे औचित्य साधून आज जि.प. प्राथमीक शाळा खळे (ता. पाटण )येथे आषाढी वारी आयोजित करण्यात आली होती वारीसाठी सर्व मुले पालक ग्रामस्थ सरपंच शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष यांनी सहभाग नोंदवला मुले व पालक यांनी भजन गायन केले. मुलांनी टाळाच्या तालावर फुगडी, कार्यक्रमाचे सादरीकरण केले.

यामध्ये खळे गावच्या सरपंच सौ वैशाली महापुरे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अमोल कचरे शाळेतील शिक्षक नितीन पवार, विकास चव्हाण, सौ विद्या यादव सर्व अंगणवाडी सेविका सौ शालन कचरे, राणी कचरे, उपस्थित होते. सर्व उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक रमेश पवार यांनी मानले व आषाढी वारीची सांगता झाली.


