ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न दादासाहेब मोकाशी कृषी महाविदयालय, राजमाची ता.कराड येथील चतुर्थ वर्षातील विद्यार्थ्यांनी ग्रामीण जागरूकता कार्यानुभव आणि कृषि औधोगिक संलग्न उपक्रमांतर्गत कुसूर (ता. कराड) येथे दि.1 जुलै या दिवसी वृक्षारोपण करून महाराष्ट्र कृषी दिन साजरा केला.

दरम्यान वसंतराव नाईक यांचे स्मरण तसेच वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रासाठी केलेले कार्य आणि त्यांचे योगदान यामुळे हा दिवस त्यांच्या स्मृतीस समर्पित आहे. या वेळी विद्यार्थ्यांनी कृषी दिन आणि कृषी दिन का साजरा करावा व वृक्षारोपणाचे महत्व या विषय मार्गदर्शन केले. कृषी प्रदर्शने,कृषी उत्पादने, तंत्रज्ञान आणि नवीन संशोधने दर्शवणारी प्रदर्शने आयोजित केले.

कृषी दिंडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन तंत्रज्ञान, सरकारी योजना आणि शेतीमधील नवनवीन पद्धतींची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी डॉ.के.एस.घुटुकडे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम अध्यक्ष अंजली चव्हान, जिल्हा परिषद माध्यमिक शाळा चे मुख्याध्यापिका कल्पना पाटील व इतर प्राध्यापक,कृषी सहाय्यक अधिकारी सिद्धार्थ भिंगारदे, तारुख गावचे सरपंच सचिन कुराडे, कृषीमित्र चेअरमन सूरेश शिंदे व विद्यार्थी तसेच ग्रामपंचायत कुसूर चे सरपंच उदयसिंह कदम, उपसरपंच संतोष पवार व ग्रामपंचायत आधिकारी यांची उपस्थिती लाभली.

कृषीकन्या संस्कृती सुतार, संध्या इंगवले, धनलक्ष्मी मोटे, ऋतुजा वासोळकर, काजल पिंगळे, अमृता ताटे , निकिता फाळके यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले.

