फलटण प्रतिनिधी:- सुरवडी गावचे सुपुत्र राष्ट्रीय समाज पक्षाचे कट्टर समर्थक युवा नेतृत्व विशाल बापू माडकर यांच्या निवासस्थानी महाराष्ट्र राज्याचे माजी पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्यविकास मंत्री व राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सदिच्छा भेट दिली.

ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांशी आपुलकीच्या नात्याने सुसंवाद साधणारे नेते म्हणून महादेव जानकर यांना ओळखले जाते.महादेव जानकर यांच्या भेटी वेळी सुरवडी येथे त्यांनी विशाल बापू माडकर यांच्या कुटुंबातील सदस्यही उपस्थित होते.महादेव जानकर यांनी माडकर कुटुंबियांसोबत संवाद साधून आपुलकीने त्यांच्या सुख-दुःखाची, आरोग्याची विचारपूस केली.

यावेळी सोबत माजी जिल्हा नियोजन समिती सदस्य सातारा जिल्हा तथा प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, सुरवडी गावचे युवा उद्योजक ज्ञानदेव साळवे, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष सुरवडी तुषार जगताप,युवा नेते निलेश लांडगे, फलटण कोरेगाव विधानसभा प्रमुख रमेश चव्हाण, विक्रम माने सोशल मीडिया प्रमुख,कुमार ऋषिकेश बिचुकले, साखरवाडी गावचे सुपुत्र मयूर धोत्रे आणि निखिल कुचेकर तसेच माडकर परिवारातील सदस्य, रासपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सुरवडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते.




