ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- काळगाव (ता. पाटण) येथील अनेक विद्युत पोल पूर्णपणे गंजून जीर्ण झाल्याने ते केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत याबाबत बातमी प्रसिद्ध होताच महावितरण ने धोकादायक विद्युत पोल हटवून त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल बसवला आला आहे.

काळगाव परिसरातील असेच काही ठिकाणी असणारे विद्युत पोल तत्काळ बदलण्याची आवश्यकता असून धोकादायक पोल मुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. हे लोखंडी विद्युत खांब अनेक वर्षापूर्वी बसवले गेले होते. सध्या ते चालू स्थितीत असून काही खांब भर वस्तीमध्ये, तर काही रस्त्याच्या कडेला असल्याने नागरिकांचे आणि लहान मुलांचे जीवन धोक्यात आले आहे.

गावातील रहिवासी अनाम काळे व इतर नागरिकांनी ग्रामपंचायतीमार्फत महावितरणकडे निवेदन देत तात्काळ खांब बदलण्याची मागणी केली आहे. त्यात स्पष्ट नमूद केले आहे की, हे पोल केव्हाही कोसळू शकतात. त्यामुळे वाहनचालक, पादचारी आणि लहान मुलांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.

महावितरणकडे दरवर्षी देखभाल व दुरुस्ती कामांसाठी ठेकेदारांची नेमणूक केली जाते व निधीही राखीव असतो. मात्र तरीही संबंधित विभागाकडून वेळेवर देखभाल होत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच संबंधित अधिकाऱ्यांच्ये डोळे उघडणार का? असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

या धोकादायक परिस्थितीची माहिती भाजपचे पाटण तालुका अध्यक्ष गणेश यादव यांना मिळताच त्यांनी “महाराष्ट्र माझा” च्या माध्यमातून या संबंधित आवाज उठवला असता. महावितरण विभागामार्फत येथील लोकवस्तीतला गंजून जीर्ण झालेला विद्युत पोल हटवून त्या ठिकाणी नवीन विद्युत पोल बसविण्यात आला.
त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून काळगावमधील धोकादायक विजेचे खांब हा गंभीर प्रश्न असून भविष्यात होणाऱ्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी महावितरण विभागाने अधिक सक्रियपणे काम करणे गरजेचे आहे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सतर्कतेमुळे या वेळी धोका टळला असला, तरी संपूर्ण गावातील उर्वरीत जीर्ण झालेले विद्युत पोल महावितरण ने लवकरात लवकर बदलणे आवश्यक आहे.

