धुमाळवाडी धबधबा येथील पर्यटकांना लुटणाऱ्या टोळीतील ३ आरोपींना अटक ७ आरोपी फरार

फलटण प्रतिनिधी:- फलटण तालुक्यातील प्रसिद्ध असणारा धुमाळवाडी धबधबा परिसरात धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांना अडवून शस्त्राचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या टोळीतील ३ आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली असून ७ आरोपी फरार आहेत.

फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, फलटण तालुक्यातील धुमाळवाडी धबधबा परिसरात दि. ८ जुलै रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास धुमाळवाडी येथील धबधबा पाहुन काही पर्यटक जाण्यासाठी निघाले असता वारुगडच्या टेकडीवरुन टेहाळणी करणा-या एकुण १० आरोपींनी महिला पर्यटकांना हेरुन धबधब्यापासून अवघ्या २०० मीटर अंतरावर गाठुन त्यांना लाकडी दांडकी व लोखंडी सु-याचा धाक दाखवुन लुटमार केल्याची घटना घडली होती. यामध्ये पर्यटक महिलांच्या गळ्यातील सोन्याचांदीचे दागिने व पर्यटक पुरुषाकडील मनगटी घड्याळ व पैसे असा एकुण ५४ हजार ५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरुन नेल्याची घटना होती.

सदर घटनेची माहिती फलटण ग्रामीण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांना माहिती कळविल्यानंतर पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने व पोलीस स्टाफ तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.या गुन्ह्यातील पिडित महिलांनी संशयितांबाबत सांगितलेल्या तुटपुंज्या वर्णनावरुन १) दिपक नामदेव मसुगडे (वय ३० वर्ष, रा. नवलेवाडी, मलवडी, ता. माण, जि. सातारा) २) विलास उर्फ बाबु दत्तात्रय गुजले (वय २१ वर्ष, रा. खांडज, ता. बारामती, जि. पुणे) ३) चेतन शंकर लांडगे (वय २५ वर्ष, रा. सोनगाव बंगला, ता. फलटण, जि. सातारा) या तीन संशयित आरोपींना ग्रामीण पोलिसांनी अटक केली.

सदर संशयित आरोपींनी गुन्ह्याची कबुली देऊन गुन्हा करताना वापरलेला चाकु व बजाज पल्सर मोटार सायकल असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.या गुन्ह्यामध्ये वरील तीन आरोपींव्यतिरिक्त १) रणजित कैलास भंडलकर २) तानाजी नाथाबा लोखंडे (दोघे रा. खामगाव, ता. फलटण, जि. सातारा) ३) अक्षय महादेव चव्हाण (रा. शिरवली, ता. बारामती, जि. पुणे) ४) वैभव सतिश जाधव, ५) रामा शंकर जाधव ६) सुरज कैलास जाधव, (रा. मलवडी, ता. माण, जि. सातारा) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्याची बाब समोर आली. सदरचे संशयित आरोपी हे सराईत गुन्हेगार असुन त्यांचेवर दरोडा, जबरी चोरी, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारमारी व विनयभंग यांसारखे गंभीर गुन्हे नोंद आहेत.

सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस सो यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक यांचे नेतृत्वात दहिवडी पोलीस ठाणेचे सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे गुन्हे प्रकटीकरण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने, पोलीस अमंलदार वैभव सुर्यवंशी, नितीन चतुरे, अमोल जगदाळे, हणमंत दडस, तुषार नलवडे, कल्पेश काशिद, नितीन धुमाल, निलेश कुदळे, अक्षय खाडे यांनी सहभाग घेतला होता.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक सुनिल महाडीक हे करीत आहेत.

error: Content is protected !!