सरडे येथे दोघांना चाकुने मारहाण केल्या प्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल

फलटण प्रतिनिधी:- सरडे येथे गोठ्यातील शेण आमच्या शेतात का टाकले असे विचारले असता दोघांना लाथाबुक्क्यानी, कळकाच्या काठीने तसेच चाकुने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, दगडू रामचंद्र धायगुडे यांची सरडे येथील गट जमिन गट नं १०६ हि जमीन त्यांनी त्यांचा पुतण्या दिलीप दतात्रय धायगुडे याला एक वर्षापुर्वी विकली असुन दिनांक ११ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास दगडू रामचंद्र धायगुडे व त्यांचा पुतण्या दिलीप दत्तात्रय धायगुडे हे शेंडगेमळा येथील शेतात जमिन गट नं १०६ मध्ये वहिवाट दाखविण्यासाठी त्याला घेवुन गेले असता जमिन गट नं १०६ ला लागुनच दक्षिण बाजुला गफुर हुसेन शेख (रा. सरडे ता. फलटण) याचा जनावरांचा गोठा आहे.

गफुर हुसेन शेख याने त्याच्या गोठ्यातील जनावरांचे शेण दिलीप दत्तात्रय धायगुडे यांच्या जमिन गट नं १०६ मध्ये टाकलेले दिसल्याने त्यांनी गफुर हुसेन शेख व त्याची मुले १) सुलेमान २) असल्म ३) सलीम ४) उस्मान ५) रहिमान ६) इरफान यांना याबाबत विचारणा केली असता गफुर, सलीम, उस्मान, रहिमान, इरफान यांनी दिलीप दत्तात्रय धायगुडे यांना शिवीगाळ करून लाथाबुक्क्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली. भांडणात दिलीप धायगुडे हा भांडणाचे शुटींग करीत असताना धक्काबुक्कीत सदरचा मोबाईल खाली पडुन फुटला त्यानंतर दगडू धायगुडे यांना भांडणात मुक्कामार व हाताला चाकु लागल्याने तसेच दिलीप धायगुडे याला मुक्कामार लागला.

हाताने लाथाबुक्क्यानी कळकाच्या काठीने तसेच चाकुने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्या प्रकरणी सात जणांच्या विरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

error: Content is protected !!