महावितरण कार्यकारी अभियंता प्रदीप ग्रामोपाध्याय यांच्या भरधाव कारच्या धडकेत एक महिला ठार, दोघे गंभीर जखमी

शिरवळ प्रतिनिधी:- फलटण महावितरण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय यांच्या भरदाव कारने शिरवळ येथील क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या ग्राउंडसमोर समोर दुचाकीला धडक देऊन पादचारी महिलेला फरफटत नेले. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय यांच्यासह दुचाकी चालक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबत शिरवळ पोलीस ठाण्यातून व घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवार दिनांक २५ जुलै रोजी ४:४५ वाजण्याच्या सुमारास मौजे शिरवळ,ता खंडाळा गावाच्या हद्दीत लोणंद ते शिरवळ जाणारे रोडवर के. एन. पी पशुवैद्यकीय कॉलेजच्या ग्राउंडचे समोर फलटण महावितरण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय (रा. कोथरुड पुणे, जि. पुणे) हे त्यांची टोयोटा कंपनीची चारचाकी कार क्र.एम.एच.-12-टी.एच-0337 चालवत होते त्यांनी त्याच्या ताब्यातील कार हयगयीने, अविचाराने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवुन शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाजवळ असणार्‍या फुलोरा सोसायटीजवळ राहणारे गणेश दिलीप भोईटे (वय 31) हे इलेक्ट्रिक दुचाकी (एमएच-11 डीके 8383) ने पंढरपूर फाटा याठिकाणी निघाले होते.

भरदाव वेगात आलेल्या महावितरण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय यांच्या गाडीने गणेश दिलीप भोईटे चालवित असलेल्या टीव्हीएस कंपनीची आयक्यु मॉडेल इलेक्ट्रीक स्कुटर क्र एम.एच.11. डी.के.8383 ला मागुन जोरदार धडक दिली व त्याच्या समोर मुलांना शाळेतून आणण्याकरता रस्त्याच्या बाजूने निघालेल्या पादचारी महिला गंगामा बसवराज कितनुर (वय 32 वर्ष, रा. फुलोरा सोसायटी शिरवळ, ता.खंडाळा,जि.सातारा) यांनाही जोराची धडक देत गंगामा कितनुर या महिलेला कारने फरफटत नेले व त्यानंतर प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय यांच्या गाडीने कंटेनर क्र. टी.एन.-52-ए.सी.-5607 ला जोरदार धडक दिली. यावेळी अपघातात गणेश दिलीप भोईटे हे स्कुटरसह रोडवर पडल्याने डोक्यास, पायास, हातास मार लागून जखमी झाले यावेळी गणेश दिलीप भोईटे यांनी हेल्मेट घातले होते गणेश दिलीप भोईटे यांना त्यांच्या शेजारी राहणारे युवराज जाधव यांनी त्यांच्या गाडीतुन जोगळेकर हॉस्पीटल तेथे उपचारास दाखल केले.

मुलांना शाळेतून आणण्याकरता रस्त्याच्या बाजूने निघालेल्या पादचारी महिला गंगामा बसवराज कितनूर (वय 32, मूळ रा. बंगळूर, राज्य- कर्नाटक सध्या रा. शिरवळ, ता. खंडाळा) यांना या अपघातात डोक्यास, दोन्ही हातास पायास गंभीर मार लागून जखमी झाल्या होत्या त्यांना जोगळेकर हॉस्पीटल येथे उपचाराकरीता आणले असता तेथील डॉक्टरांनी गंगामा बसवराज कितनूर यांना तपासुन अपघातात गंभीर जखमा मुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मृत महिलेचे शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.फलटण महावितरण विभागीय कार्यालयाचे कार्यकारी अभियंता प्रदीप प्रकाश ग्रामोपाध्याय यांना अधिक उपचाराकरिता पुणे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून याप्रकरणी फिर्यादी चेतन दिलीप भोईटे (वय 33 वर्ष व्यवसाय पेटींग शॉप, सध्या रा. भोईटे निवास फुलोरा सोसायटीचे मागे शिरवळ, ता. खंडाळा जिल्हा-सातारा मुळ रा. हिंगणगाव, ता. फलटण, जि. सातारा) यांनी याप्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात हजर राहून गुन्हा दाखल केला आहे. या अपघातात टीव्हीएस कंपनीची आयक्यु मॉडेल इलेक्ट्रीक स्कुटर क्र एम.एच.-11-डी.के.8383 व टोयोटा कंपनीची चारचाकी कार क्र.एम.एच.12टी. एच.0337 या दोन्ही गाड्याचे मोठे नुकसान झाले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास शिरवळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यशवंत नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हवा.धायगुडे करीत आहेत.

error: Content is protected !!