मौजे मंद्रुळ कोळे ग्रामपंचायतच्या वतीने 115 वृक्षांचे वृक्षारोपण व शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उद्घाटन

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव) :- मौजे मंद्रुळकोळे तालुका पाटण येथील गावच्या लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री रणजित पाटील यांच्या संकल्पनेतुन आणि ग्रामपंचायत मंद्रुळकोळे यांच्या सौजन्याने आज शुक्रवार दि.२५/०७/२०२५ रोजी. वॉटर एटीएम शुध्द फिल्टर पाण्याच्या मशीनचे उद्घाटन व वृक्षारोपण समारंभ पार पडला.या वॉटर एटीएम च्या माध्यमातुन सर्वांना अत्यंत शुल्क दरात शुध्द व फिल्टर पाणी मिळणार असून येथील व्यापाऱ्यांना व नागरिकांना याचा लाभ मिळणार आहे.

याप्रसंगी बोलताना युवानेते रणजित सर्जेराव पाटील म्हणाले जे कोणी नागरिक झाडे जगवण्याची जबाबदारी घेतील त्या त्या नागरिकांना एका झाडामागे प्रतिवर्षी घर फळ्यामध्ये 200 रुपये ची सूट देण्यात येईल. असे आवाहन केले.

यावेळेस लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री रणजित पाटील,उप.सरपंच सपन पाटील, सदस्या-प्रमिला पाटील, पुनम काळुगडे,विमल शिंदे, सदस्य गुलाबराव पाटील, सर्जेराव कदम, सुभाष ढेब , तंटामुक्ती अध्यक्ष हिंदुराव पाटील(बाबा), ग्रामसेविका पाटील, अशोक पाटील(तात्या), बाळासाहेब पाटील पाणीपुरवठा अध्यक्ष, शिवाजी पाटील, सरदार पाटील, नारायण सुतार, लालासो पाटील, विजय ढेब, शंकर ढेब(आण्णा), काका ढेब, सुर्यकांत ढेब, शरद ढेब, बळवंत पाटील(अध्यक्ष यात्रा कमिटी), सुरेश पाटील(चेअरमन) आकाराम पाटील(भाऊ), विजय काळुगडे, विजय पाटील(दादा), पी.डी.पाटील(बापु), दिपक पाटील, सुदाम सोनावले, जगन सोनावले, विशाल गायकवाड, व ईतर सर्व सन्माननिय ग्रामस्थ मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

error: Content is protected !!