ढेबेवाडी प्रतिनिधी :- मौजे मंद्रूळकोळे येथे ग्रामपंचायत कार्यालयासमोर भारताचा ७९ वा.स्वातंत्र्यादिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.माजी.सैनिक श्री.आकाराम पाटील (भाऊ)व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
तसेच यावेळी आजच्या दिवशी ग्रामपंचायत मंद्रूळकोळे येथे तंटामुक्ती अध्यक्ष्यांची निवड करण्यात आली.महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष म्हणून शांताराम विष्णू पाटील (बाळू दादा) यांची एकमताने निवड करण्यात आली.
यावेळी युवानेते रणजित पाटील,लोकनियुक्त सरपंच भाग्यश्री रणजित पाटील, उप. सरपंच सपना पाटील, सदस्य. सर्जेराव कदम, गुलाबराव पाटील,व इतर सदस्य, ग्रामविकास अधिकारी पाटील मॅडम आणि सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

