सातारा प्रतिनिधी:- सातारा जिल्हा सहकारी गृहनिर्माण संस्थांचा सहकारी संघ मर्यादित सातारा वार्षिक सर्वसाधारण सभा महिला मंडळ सातारा राजवाडा या ठिकाणी नुकतीच खेळीमेळीत पार पडली.
नंदकुमार काटे चेअरमन,शशिकांत पारेख व्हॉइस चेअरमन, रंगराव जाधव सचिव, डॉक्टर शंकर मोरे, जहांगीर इनामदार,सुरेंद्र सबनीस, विश्वासराव देशमुख,पांडुरंग बिचकर, गौतम किर्ते,बाळासाहेब माने, विवेक वंजारी, प्रमोद घाडगे,सौ सीमा जाधव, मिना कांबळे,वसंतराव तरडे सर्व संचालक तसेच दशरथ निकम कायदेशीर सल्लागार, रविंद्र भणगे विभागीय सचिव, सोमनाथ माघाडे विभागीय सचिव, रवींद्र अवताडे सहसचिव हे यावेळी उपस्थित होते.
यावेळी 27 वा वार्षिक अहवाल व ताळेबंदर सादर करण्यात आला वार्षिक अहवाल व ताळेबंदर या विषयावर अत्यंत खेळीमेळीने आणि आनंदी वातावरणात चर्चा पार पडली. जिल्ह्यातील 50 संस्थांचे प्रतिनिधी पावसाळ्याच्या सतत पाऊस असून सुद्धा उपस्थिती लक्षणीय होती. गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी सोसायटीचे पदाधिकारी या सर्वांनी सहभाग घेतला होता.
सीमा जाधव, शिवाजीराव चव्हाण,मदन पिसे, विजय लाड, आबा दरे,शांताराम वाघ,प्रल्हाद गायकवाड यांनी प्रश्नोत्तरात सहभाग घेतला. विविध विषयावर पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत पारेख यांनी केले व आभार सीमा जाधव यांनी मानले.

