पवारवाडी( कुठरे) येथे काल रात्री घरपोडी, चोरट्यांकडून 7 लाख 82 हजार किंमतीचा सोन्याचा ऐवज लंपास

ढेबेवाडी प्रतिनिधी (महेश जाधव):- पावरवाडी कुठरे ता. पाटण येथे राहत्या घरी चोरी करून अज्ञात चोरट्याने 7 लाख 82 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पावरवाडी (कुठरे) येथील दिनकर कृष्णा पवार यांचे राहते घरी बुधवारी रात्री साडेसहा ते पावणे दहा दरम्यान अज्ञात चोरट्याने घराच्या पाठीमागील दरवाज्याची कडी कोयंडा तोडून घराच्या पाठीमागील खोलीत असलेल्या लोखंडी कपाटातील लॉकर तोडून त्यामध्ये असलेले सुमारे 7 लाख 82 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 500 रुपये किंमतीच्या चार नोटा चोरून नेहल्या.

यामध्ये सोन्याचे गंठण, लक्ष्मीहार, नेकलेस, चेन, बांगड्या, अंगठी, बुगड्या, मनी, याच बरोबर रोख रक्कम असा समावेश आहे.सदर घटनेची नोंद ढेबेवाडी पोलिस ठाण्यात झाली असून या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. प्रविण दाइगडे करत आहेत.

error: Content is protected !!