फलटण प्रतिनीधी:- वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व माजी विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक उपक्रम आयोजित केला.

ज्या समाजात आपण जीवन जगतो त्या समाजाबद्दल ऋण व्यक्त करणे आपले सामाजिक कर्तव्य आहे. या तत्वाला अनुसरून SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व विद्यार्थी भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापन दिनानिमित्त १५ ऑगस्ट २०२५ रोजी एक प्रयत्न सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक उपक्रम आयोजित केला.

या उपक्रमाला अनुसरून दिनांक १५ ऑगस्ट २०२५ रोजी SSC मार्च 2007 विद्यार्थी मार्फत सर्व प्रथम सकाळी 7.30 वाजता असाहाय्यांसाठी सहाय्याचा लढा या उक्तीप्रमाणे आई अनाथ आश्रम मलठण फलटण येथील मातृ पितृ समान वृद्धांना फळ वाटप ( सफरचंद व केळी ) करण्यात आले. त्या नंतर ओमकार वृद्धाश्रम कुरवली खुर्द येथील वृद्धांसाठी देखील फळ (केळी व सफरचंद ) वाटप करण्यात आले.

दोन्ही ठिकाणी कार्यक्रम संपन्न करून सर्व प्रतिनिधी टीम सकाळी ठीक ९.३० वाजता ज्या ठिकाणी आपण आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. अशा आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेली जिल्हा परिषद शाळा वाठार निंबाळकर, जिल्हा परिषद शाळा जुनागाव, वाठार हायस्कूल वाठार निंबाळकर या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले .

या ठिकाणी आपल्या SSC मार्च 2007 बॅचमार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये १ ली ते ४ थी – स्केच पेन किट,५ वी ते ७ वी – नटराज किट (पेन्सिल, स्केल, इरेझर,शार्पनर), ८ वी ते १० वी – कंपास किट इत्यादी एकूण २५० विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्य वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला.या अविस्मरणीय कार्यक्रमासाठी SSC मार्च 2007 बॅच मधील सर्व विद्यार्थ्यांनी केलेल्या आर्थिक मदतीचा हातभार लागला.

