ढेबेवाडी प्रतिनिधी :- ढेबेवाडी भागातील मंद्रुळकोळे खुर्द परिसरातील यादववाडी जवळच्या मराठी शाळेच्या बाजूच्या शिवारात सकाळी दोन बिबट्याची पिल्लं. गेल्याने लोकांच्या भितीचे वातावरण पसरले आहे. गावानजीकचा डोंगरात बिबट्याचा मुक्काम असल्याचे या घटनेवरून दिसून येत असल्याने येथील लोकांची चिंता वाढली आहे.वनविभागाने तातडीने त्या परिसरात पिंजरा बसविण्याची मागणीही होत आहे.
गेली अनेक वर्षापासून या परिसरात बिबट्याचा वावर सातत्याने वाढला आहे.एक दोन दिवसांनी बिबट्या कोणत्या ना कोणत्या वस्तीत लोकांना दिसत आहे. त्यामुळे लोकांच्यात धास्ती वाढली आहे.गावच्या परिसराच्या वरच्या बाजूला डोंगर- द-या असल्याने वन्यप्राणीचा येथे कायम राबता आहे.
वन्य श्वापदांसह बिबट्याचा उपद्रवही वाढत चालल्याने शेतकरी व ग्रामस्थांत घबराटीचे वातावरण आहे.आतापर्यंत या परिसरातील अनेक पाळीव प्राण्यांचा बिबट्याने फडशा पाडला आहे.गेल्या काही दिवसांपासून गावाजवळच्या डोंगरातच बिबट्याचा मुक्काम असल्याने डोंगरात नित्य जनावरे चरण्यास नेणाऱ्या शेतकऱ्यातून काळजीचा सूर उमटत आहे.
यादववाडी येथील दादासाहेब साळुंखे हे सकाळी लवकर घरातून शेताकडे जात असताना त्यांना दोन बिबट्याची पिल्लं शेतातून डोंगराच्या दिशेने जाताना दिसली त्यांनी ही माहिती येथील लोकांना दिली.त्यामुळे बिबट्याचा या परिसरातच आहे त्यामुळे लोकांनी शेतात किंवा जनावरे घेवून जाताना सावधगिरी बागळण्याची गरज आहे.
शेतकरी आणि त्यांच्या पाळीव जनावरांच्या नित्य ये-जा करण्याच्या मार्गावरच बिबट्या असल्याने शेतकरी जनावरे डोंगरात चरण्यास न्यायला घाबरत आहेत.वन विभागाने तात्काळ पाऊले उचलून सुरक्षितता देण्याची गरज आहे
मंद्रुळकोळे खुर्द परिसरात बिबट्याचा वाढता उपद्राव हा येथील लोकांना मोठा त्रासाचा झला आहे. बिबट्या कुठून कधी येईल हे सांगणे अवघड झाले आहे.येथील अनेक पाळीव जनावरे बिबटयाने मारली असल्याचे प्रकार घडले आहेत.हे थांबविण्यासाठी वनविभागाने योग्य पाऊले उचलावी.
दादासाहेब साळुंखे,अध्यक्ष, मंद्रुळकोळे सेवा सोसायटी.

