अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे महाराजा मल्टीस्टेटची घोडदौड सुरुच ; दिलीपसिंह भोसले

फलटण प्रतिनीधी:- महाराजा मल्टीस्टेट संस्था प्रगतिपथावर असून सभासदांचा विश्वास जपण्यास यशस्वी ठरली आहे ,त्यामुळेच संस्थेचा प्रगतीचा आलेख दिवसेंदिवस चढता असल्याचे दिसत असून अत्यंत स्वच्छ व पारदर्शक कारभारामुळे महाराजा मल्टीस्टेट ची घोडदौड सुरु असून महाराजा मल्टी पर्पज च्या माध्यमातून विविध उपक्रम भविष्यात राबविले जातील, असे प्रतिपादन महाराजा मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांनी केले.

महाराजा मल्टीस्टेटच्या 15 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या प्रसंगी अध्यक्षस्थानावरून दिलीपसिंह भोसले, ज्येष्ठ पत्रकार महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे चे सातारा जिल्हा प्रतिनिधी रवींद्र बेडकीहाळ, श्री. सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले, सर्व संचालक व शाखा कार्यकारी समितीचे चेअरमन उपस्थित होते. दिलीपसिंह भोसले म्हणाले, काटकसरीने व पारदर्शकपणे संचालक मंडळाने कारभार केल्याने आज महाराजा मल्टीस्टेट ला नॅशनल अवॉर्ड तीन वेळा प्राप्त झालेला आहे.

कोअर बँकिंगची सुविधा उपलब्ध करून अत्याधुनिक पद्धतीने संस्थेचा कारभार व कामकाज केले जात आहे. स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी अत्याधुनिक व सर्व सुखसुविधा उपलब्ध करून संस्था अत्याधुनिक सुखसुविधा सभासदांना उपलब्ध करून दिल्या आहेत. सभासदांच्या मागणीवरून 75 वर्षे वया वरील ठेवीदारकांना अर्धा टक्के ज्यादा व्याज दर देण्याचा निर्णय आपण घेत आहोत.प्रास्ताविकामध्ये बोलताना संस्थेचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांनी सन 2024-25 या आर्थिक वर्षात संस्थेस 1 कोटी 56 लाख 23 हजार नफा झाला असल्याचे सांगून 10 टक्के लाभांश जाहीर केला तसेच संस्थेने संस्थेचे प्रधान कार्यालय अत्याधुनिक केलेली आहे, तसेच नवीन शाखांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवल्या असून लवकरच त्यास मंजुरी मिळेल मंजुरी मिळाल्यानंतर नवीन शाखा सुरू करण्याचा संस्थेचा मानस असल्याचे दिलीपसिंह भोसले यांनी याप्रसंगी सांगितले.संस्थेचे सि.ई.ओ संदीप जगताप यांनी विषय पत्रिकेचे वाचन केले व सूत्रसंचालन केले.

संचालक शिवराज नाईक निंबाळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. सभेस संस्थेचे संचालक तसेच सभासद उपस्थित होते.वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न झाली.

फोटो ओळ –बोलताना दिलीपसिंह भोसले, व्यासपीठावर रवींद्र बेडकिहाळ,श्रीराम बझारचे संचालक जयकुमार शिंदे, सद्गुरु पतसंस्थेचे चेअरमन तेजसिंह भोसले ,सर्व संचालक

error: Content is protected !!