ढेबेवाडीतील नागरिकांच्या आरोग्याशी खेळ,रेशनिंग दुकानात मिळतोय सडलेला गहू, आळ्या झालेला तांदूळ

ढेबेवाडी प्रतिनिधी :- पाटण तालुक्यातील रेशनिंग दुकानांतून नागरिकांना सडलेला गहू आणि आळ्या झालेला तांदूळ वितरिता झाल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी होत असलेल्या या थेट खेळामुळे सर्वसामान्यांमध्ये संताप उसळला असून हे धान्य तालुका पुरवठा अधिकारी व गोडाऊन कीपर यांनी आधी खाऊन दाखवावे असा संतप्त सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.

सध्या नागरिकांना तीन महिन्यांतून एकदा रेशर्निंग मिळते. गेल्या चार दिवसांत तालुक्यातील बहुतांशा गावांत धान्याचे वाटप झाले. ढेबेवाडीसह अनेक गावांमध्ये नागरिकांच्या हातात पोचलेले धान्य पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे असल्याचे उघड झाले आहे. गव्हामध्ये कुज, सड व तांदळात सर्रास आळ्या निघाल्या. हे धान्य खाल्ल्यास गंभीर आजार, होण्याचा धोका नाकारता येणार नाही. तरीसुद्धा पुरवठा विभागाकडून या गंभीर विषयाकडे संपूर्ण दुर्लक्ष होत असून जबाबदारी झटकणाची भूमिका घेतली जात आहे.

ढेबेवाडी मंद्रूळकोळे येथील सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते यानी सडलेला गहू, व आळ्यानी भरलेला तांदूळ यावरती प्रतिक्रिया व्यक्त करत नागरिकांच्या आरोग्याशी थेट खेळ केला जात असल्याचा आरोप केला. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, असे धान्य आमच्यावर लादण्यापेक्षा ते तालुका पुरवठा अधिकारी व गोडाऊन कीपर यांनी आधी खाऊन दाखवावे.या प्रकारामुळे ढेबेवाडीसह गावातील नागरिक संतप्त झाले आहेत.

महागाई आणि बेरोजगारीच्या संकटात सापडलेल्या सर्वसामान्य कुटुंबांना जगण्यासाठी आधार मिळावा म्हणून सरकारकडून दिले जाणारे रेशनिंग धान्य जर खाण्यायोग्य नसेल तर ती योजना नसून मृत्यू योजना आहे, अशा तीव्र प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते अजित मोहिते याच्यांकडून येत आहेत. हा प्रकार थेट जिवावरचा प्रश्न ठरत असल्याने तातडीने कार्यवाही होणे आवश्यक आहे.

error: Content is protected !!