फलटण प्रतिनिधी: दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने संकरित जर्सी होस्टन गायींचे गोठे करायचे असतील तर गोवंश हत्या बंदी कायद्यात सुधारणा होणे काळाची गरज आहे या कायद्याच्या माध्यमातून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांच्या गोठ्यामधील गाभ न धरणाऱ्या गाई म्हशी वयस्कर गाई विविध कारण मुळे दूध न देणाऱ्या गाई अशा गाईंचे संगोपन करणं तसेच ज्या जर्सी होस्टन गाई व्यायल्यानंतर ज्यांना खोंड होत आहेत अशा खोडांचा गंभीर प्रश्न दूध धंद्यातील दराच्या चढ-उतारामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यापुढे निर्माण झाला आहे या मागण्यांसाठी तसेच शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तहसिल कार्यालय फलटण येथे माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली व रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांच्या नेतृत्वाखाली मोर्चाचे आयोजन करणयात आले आहे.
मागण्यांमध्ये गोवंश हत्याबंदी सारख्या शेतकरी विरोधी कायद्यांमध्ये सुधारणा करणे काळाची गरज आहे तसेच या गोवंश हत्याबंदी कायद्याच्या मुळे त्रस्त झालेला महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी आमदार सदाभाऊ खोत यांनी या कायद्याच्या विरोधामध्ये घेतलेल्या प्रखर भूमिकेमुळे कधी नव्हे तो एकवटल्याच चित्र संपूर्ण महाराष्ट्रात पाहावयास मिळत आहे.
त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्यांच्या ऊसाला प्रति टन चार हजार रुपये भाव मिळण्यासाठी साखरेचे आधारभूत किंमत प्रति किलो चाळीस रुपये करण्यात यावी नैसर्गिक संकटामुळे त्याचबरोबर विविध पिकांना नसलेल्या बाजारभावामुळे शेतकरी कर्जाच्या ओजाखाली सापडला आहे त्यामुळे त्याला संपूर्ण कर्जमाफी मिळावी अशा विविध मागण्यांसाठी मंगळवार दि २३ रोजी सकाळी १०:३० वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक फलटण येथून तहसील कार्यालय फलटण येथे धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
या मोर्चाचे नेतृत्व रयत कांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाध्यक्ष अमोल खराडे बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जनावरे बाजारांमधील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सुनील मुळीक,खंडू करचे, तालुकाध्यक्ष अभिमन्यू ढोपरे, विकास यादव, कांतीलाल गोडसे, प्रशांत माने, हनुमंत शिपकुले, दत्तात्रय गोफने, खंडेराव सरक, शेखर खरात,हेमंत सुतार, प्रसाद अनपट, सुधीर क्षीरसागर, दादा गोफणे, चेतन चव्हाण, संतोष जावळकर, राजेश खराडे,निलेश सोनवलकर,दीपक सस्ते,संतोष शेडगे, सागर डोईफोडे,साई शिदे,पांडुरंग गायकवाड,योगेश संकपाळ, विशाल संकपाळ, तुकाराम गावडे, अमर गावडे, सागर सोनवलकर, अलंकार भोईटे, भरत नांगरे,प्रवीण कदम, बाळू शिंदे, रामदास सोनवलकर,नवनाथ कुंडलकर, त्रिंबकराव डोंबाळे, दीपक डोंबाळे, अक्षय झणझणे आदी दूध उत्पादक शेतकरी उपस्थित होते.

