महाराष्ट्र माझा न्युज नेटवर्क
फलटण : ऐन निवडणुकीच्या काळात खासदार गटाला एक मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व माजी विरोधी पक्षनेते समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे अत्यंत जवळचे विश्वासू सहकारी आणि नगरपरिषदेचे माजी गटनेते अशोकराव जाधव यांनी आज सोमवार दिनांक २९ रोजी पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास एका व्हॉट्सॲप स्टेटसद्वारे भाजप व खासदार गटाचा राजीनामा देत असल्याची स्टेट्स पोस्ट केल्याने खासदार गटात खळबळ उडाली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नगरपरिषदेचे माजी गटनेते अशोकराव जाधव यांनी आज पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास ठेवलेल्या स्टेटसमध्ये असे म्हटले आहे की, “लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांची माफी मागून मी लवकरच भाजप व खासदार गटाचा राजीनामा देत असून, या पुढे कोणत्याही राजकीय पक्षाचे काम करणार नाही.” या पोस्टमुळे खासदार गटात एकच खळबळ उडाली आहे.
एकीकडे मागील काही दिवसांपासून राजे गट यांचे राजकीय मनोमिलनबाबत चर्चा सुरू होती काल त्यात मिठाचा खडा पडला असल्याची माहिती मिळत होती राजे गटाचा भाजप प्रवेशाला ब्रेक लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे आता राजे गट अजित पवार राष्ट्रवादी गट किंवा राजे गट विभागून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटातून पुढील निवडणुका लढू शकतो याबाबत राजे गटाची चाचपणी सुरू असून याबाबत काही दिवसात चित्र स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे राजकीय मनोमिलनाच्या चर्चेवर काल रविवार दिनांक २८ रोजी सोशल मीडियावर अशोकराव जाधव यांनी राजे गटावर आरोप करत ‘वापर करायचा व फेकून द्यायचे’ अशी घणाघाती टीका करणारो पोस्ट टाकत माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त करत मनोमिलनाच्या चर्चेवर विश्वास न ठेवण्याची बाब बोलून दाखवली होती.
अशोकराव जाधव यांनी लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्या काळापासून गटात सक्रिय आहेत सत्ता असो किंवा नसो ते सतत लोकनेते स्व. हिंदुराव नाईक निंबाळकर व माजी खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांच्या गटात सक्रिय होऊन त्यांनी नगरपरिषदेत गटनेता म्हणूनही काम पाहिले आहे. सत्ता असली काय व सत्ता नसली काय याचा प्रभाव अशोकराव जाधव यांच्यावर पडला नाही.
आज अचानक ‘लोकनेते हिंदुराव नाईक निंबाळकर यांची माफी मागून…’ भावनिक शब्दप्रयोग करून अशोकराव जाधवांची गटातून बाहेर पडण्याची घोषणा केल्याने फलटण शहरासह तालुक्यात या पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशोकराव जाधव यांनी एवढा टोकाचा निर्णय का घेतला याची माहिती अद्याप मिळाली नसून पण यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

